घरमहाराष्ट्रनाशिकफायरिंग करत नाशिकमध्ये लुटले साडेतीन लाख रुपये

फायरिंग करत नाशिकमध्ये लुटले साडेतीन लाख रुपये

Subscribe

नाशिक शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात एअर गनद्वारे फायरिंग करत एका व्यापाऱ्याकडील साडेतीन लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी, ३० मार्चला रात्री घडली. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पाळत ठेवून ही धाडसी लूट केल्याचे सांगितले जाते आहे.

नाशिक शहराच्या मध्यवर्ती आणि वर्दळीच्या भागात एअर गनद्वारे फायरिंग करत एका व्यापाऱ्याकडील साडेतीन लाख रुपये लुटल्याची घटना शनिवारी, ३० मार्चला रात्री घडली. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी पाळत ठेवून ही धाडसी लूट केल्याचे सांगितले जाते आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरणपूर रोडवरील राका कॉलनी भागात असलेल्या गजानन स्मृती अपार्टमेंटमध्ये राहणारे विराग शाह हे गोळे कॉलनीमधील आपल्या वैद्यकीय साहित्य विक्रीचे दुकान बंद करुन घरी परतले. त्यांच्या मागोमाग पाठलाग करत तिघे मोटरसायकलस्वारही आले. या तिघांपैकी एकाने शाह यांच्या दिशेने गोळीबार करत दहशत निर्माण केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या शाह यांनी जिन्याकडे धाव घेतली. मात्र, याच वेळी त्यांच्या हातातील साडेतीन लाख रुपये असलेली बॅग दुचाकीवरील दोघांनी हिसकावून ताब्यात घेतली. पिस्तुलधारी लुटारूदेखील गेटबाहेर आला. दरम्यान, आवाज ऐकून त्यांच्या अपार्टमेंटसमोरील वॉचमन घराबाहेर धावत आला. हे पाहताच पिस्तुलधारी लुटारूने त्यांच्यावर पिस्तुल रोखली. त्यामुळे नाईलाजास्तव वॉचमन चटकन वाहनांमागे लपला. या परिस्थितीचा फायदा घेत तिघेही मोटरसायकलवरुन सुसाट वेगात फरार झाले.

- Advertisement -

अचानक घडलेल्या या प्रकारामुळे भांबावून गेलेल्या शाह यांनी घर गाठून झाल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनासथळी भेट देत पाहणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -