घरमहाराष्ट्रनाशिकनाशिक शहरात आठवडाभरात तीन खून

नाशिक शहरात आठवडाभरात तीन खून

Subscribe

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलीस उपायुक्त विजय खरात यांचे आवाहन

नाशिक : शहरात आठवडाभरात तीन खून झाले आहेत. त्यात पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरीही या घटनांमुळे सर्वसामान्य नाशिककरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलिसांचे कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष आहे. २५ दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी केले.

पोलीस उपायुक्त खरात म्हणाले, विनायक बर्वे व अमोल इघे हे दोघेही मित्र होते. त्यांच्यात कंपनीत युनियन लावण्यावरुन वाद होता. बर्वेविरुद्ध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे दोन गुन्हे दाखल असून, न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  नाशिक शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. आता पेट्रोलपंपावर शिस्त लागली असल्याने बंदोबस्त काढून घेण्यात आला आहे. शहरात बीट मार्शल, सीआर मोबाईलसह पोलीस गस्त घालत आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -