घरमहाराष्ट्रनाशिकवाहन झाले टोईंग, नाशिककर रोईंग

वाहन झाले टोईंग, नाशिककर रोईंग

Subscribe

टोईंगविरोधात आम आदमी पक्षाचे आंदोलन

नाशिक : टोईंगवाले झाले मस्त, नाशिककर झाले त्रस्त, पार्किंग नाही पुरेशी, म्हणून गाडी लावली कडेशी, वाहन झाले टोईंग, नाशिककर रोईंग’.. अशा घोषणा देत आम आदमी पक्षाने शहरातील टोईंग कारवाईचा निषेध केला. गोल्फ क्लब मैदानाच्या प्रवेशव्दारावर हे आंदोलन करण्यात आले.

शहरात अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीला आळा बसावा, यासाठी टोईंग कारवाई सुरू आहे. यासंदर्भात अनेकदा नागरिकांनी आंदोलनेदेखील केली. मात्र, वाहतूक पोलिसांकडून टोईंगविरोधातील कारवाई सुरूच आहे. खासगी ठेकेदाराला टोईंग दिल्यानंतर नाशिककरांची पार्किंग केलेली वाहने सर्रासपणे उचलून टोईंग केली जातात. एकीकडे पार्कींगसाठी पर्यायी जागा नसताना वाहतूक विभाग मात्र टोईंगची कारवाई करत आहे. याचा जाब विचारण्यासाठी आपकडून निषेध आंदोलन करण्यात आले.

- Advertisement -

पार्किंगमाफीया बंद करा, कामचुकार भ्रष्टाचारी.. देशद्रोही देशद्रोही अशा घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले. यावेळी नाशिक मध्य व पश्चिम विधानसभा अध्यक्ष राजेंद्र गायधनी, सचिव जगबीर सिंग, नीलम बोबडे, कस्तुरी आटवणे, रघुनाथ चौधरी, पी. एस. चांदसारे, प्रतीक पवार, राज कुमावत, समाधान अहिरे, संजय कातकाडे , पंकज निकम , नितीन रेवगडे , योगेश कायस्थ, पद्माकर अहिरे, राजेंद्र हिंगमिरे, कुलजित कौर, पुष्पा ढवळे, प्रमोधिनी चव्हाण, विलास देसले, नितीन भालेराव, सोमा कुर्हाडे, श्रीपाद सोनवणे आदी सहभागी होते.

स्मार्ट शहर म्हणून नाशिक शहराची ओळख होते आहे. मात्र, शहरात पार्किंगला जागाच नाही. मग वाहन पार्क कुठे करावे, असा प्रश्न पडतो. नाईलाजास्तव जागा मिळेल तिथे नागरिक वाहन पार्किंग करतात. ही संधी साधत वाहतूक विभागाने टोईंगचा ठेका दिलेले कर्मचारी अनेकदा नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. पार्किंगची जागा उपलब्ध करून द्या, त्यानंतरच जे वाहनचालक नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा नाशिककर याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.
– जितेंद्र भावे, आम आदमी पार्टी

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -