घरमहाराष्ट्रनाशिकउपाययोजनाअभावी यात्रा मार्गावर कचर्‍याचे साम्राज्य

उपाययोजनाअभावी यात्रा मार्गावर कचर्‍याचे साम्राज्य

Subscribe

चैत्रोत्सव सुरू असताना व सांगतेनंतर पदयात्री मार्गावर मोठ्या प्रमाणात होणारा कचरा ही मोठी समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध शक्तीपीठ असलेल्या आदिशक्ती श्री सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवास १३ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यात्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत येतात. विशेषतः खान्देशातून लाखो भाविक येतात. दरम्यान, यात्रोत्सव सुरू असताना व सांगतेनंतर पदयात्री मार्गावर मोठ्या प्रमाणात होणारा कचरा ही मोठी समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे.

सात दिवसीय यात्रोत्सवास खान्देश भागातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात पायी चालत येणार्‍या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. भाविकांचा मुख्य मार्ग मालगोव – लोहणेर – विठेवाडी – भऊर – कळवण, असा आहे. पदयात्रींसाठी ठिकठिकाणी अनेक सेवाभावी संस्था, संघटना, मित्रमंडळ मोफत पाणी, चहा , नाष्टा, महाप्रसाद वाटप करतात. अनेक छोटे मोठे दुकाने मांडण्यात येतात. या मोफत स्टॉल व दुकानांचे प्रमाण देवळा तालुक्यातील लोहणेर ते कळवणपर्यंत मोठ्या प्रमाणात असते. परंतु, कचर्‍याच्या विल्हेवाटसाठी कुठलीही उपयोजना होत नाहीत. रस्त्यावर कचराकुंड्या उपलब्ध नसल्याने कचरा रस्त्यावर टाकला जातो. परिणामी यात्रोत्सव काळात व संपल्यावर सर्वत्र कचरा नजरेस पडतो. मालेगाव – लोहणेर- भऊर – कळवण या प्रमुख रहदारीच्या रस्त्याच्या कडेला नजर जाईल तिकडे फक्त कचरा दिसतो. मोठ्या प्रमाणात होणार्‍या या कचर्‍यात प्लॅस्टिक जन्य कचर्‍याचे प्रमाण अधिक प्रमाणात असते. तसेच यात न खाल्लेले अन्न मोठ्या प्रमाणात असते. तसेच पदयात्रींसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याने जवळपास सर्वच भाविक उघड्यावर जातात परिणामी सर्वत्र दुर्गंधी पसरते. रस्त्यात पडणारे प्लॅस्टिक हवेने उडत इतरत्र जाते. जे जनावरांच्या खाण्यात आल्याने जनावरे दगवल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यात्रोत्सवात कचर्‍याची योग्य विल्हेवाट लावली गेली तर तीच खरी आई सप्तशृंगी मातेची सेवा असेल.

- Advertisement -

जनजागृतीची गरज

अन्नदान करणारे व व्यावसायिकांनी किमान जवळ कचराकुंडी ठेवावी व कचरा तेथेच टाकावा, अशी सुचनाफलक लावत जनजागृती होणे गरजेचे आहे. शासन, स्वयंमसेवी संस्था, मित्र मंडळ स्थानिक ग्रामपंचायतांनी जनजागृती करत कचरा विल्हेवाटीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी कचराकुंडी, फिरते शौचालय या उपयोजना होणे गरजेचे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -