घरमहाराष्ट्रनाशिकमहापालिका चौकीदारांना ‘अच्छे दिन’

महापालिका चौकीदारांना ‘अच्छे दिन’

Subscribe

महापालिकेच्या ‘चौकीदारांना’ खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना अथक प्रयत्नानंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महापालिकेच्या ‘चौकीदारांना’ खर्‍या अर्थाने ‘अच्छे दिन’ आले असून त्यांना अथक प्रयत्नानंतर एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षारक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दोन वर्षांपूर्वी आमदार बच्चू कडू यांनी थेट तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्या हल्ल्याची राज्यभर चर्चा झाली. त्यानंतर नवरात्रोत्सव काळात उभारण्यात येणार्‍या गाळ्यांच्या लिलावावरून पालिका मुख्यालयात हाणामारी झाली होती. तसेच एका अतिउत्साही कार्यकर्त्याने कमरेला बंदुक लावून महापालिकेच्या मुख्यालयात प्रवेश केला. महापालिकेचे सुरक्षा रक्षक असताना हा प्रकार घडल्याने खासगी सुरक्षा रक्षक नेमण्याचा निर्णय घेण्याचा विचार पुढे आला. महापालिकेच्या आस्थापनेवर १३८ कायम सुरक्षा रक्षक कार्यरत असले तरी, सुरक्षारक्षकांची ही संख्या अपुरी आहे. त्यामुळे गेल्या वर्षी महापालिकेने सुरक्षा महामंडळाकडून ४५ खासगी सुरक्षारक्षक घेतलेे. या सुरक्षारक्षकांच्या नियुक्तीवरून बरेच वादंग निर्माण झाले. हे सुरक्षा रक्षक बंदुकधारी असल्याने सर्वसामान्यांवर दहशत निर्माण होईल, त्यामुळे सर्वसामान्य महापालिकेत फिरकणारच नाहीत, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. परंतु सर्व अडचणींवर मात करीत संबंधित सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आली.

- Advertisement -

कोणतेही शिष्ठमंडळ आयुक्तांना भेटायला येते तेव्हा पाचच लोकांना मुख्यालयात जाण्याची परवानगी दिली जाते. मुंढे यांच्याबाबत वादंग निर्माण झाले असताना त्यांच्या समर्थनार्थ महापालिकेत आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांना मुंढे यांना भेटण्यासाठी मुख्यालयात पाठविण्यात आल्याचे खापर संंबंधित सुरक्षा रक्षकांवर फोडण्यात आले. त्यात संबंधितांच्या कंत्राटाची मुदतही संपल्यानंतर सुरक्षा रक्षकांना मोठाच संघर्ष करावा लागला. त्यानंतर या सुरक्षारक्षकांना एक वर्षाचा कार्यकाळ वाढवून देण्यात आला आहे.

आचारसंहितेनंतर सुरक्षारक्षकांची नियुक्ती

आचारसंहिता झाल्यानंतर महापालिकेच्या ६ मोठ्या रुग्णालयांसह ३० प्राथमिक आरोग्य केंद्र, ९० शाळा, १०१ जलशुद्धिकरण केंद्र, नाट्यगृहांमध्येही खासगी सुरक्षारक्षककांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -