घरताज्या घडामोडीपवार-अदानींच्या भेटीवर आव्हाडांचे स्पष्टीकरण; म्हणाले, 'कुठलाही गैर अर्थ...'

पवार-अदानींच्या भेटीवर आव्हाडांचे स्पष्टीकरण; म्हणाले, ‘कुठलाही गैर अर्थ…’

Subscribe

आज गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या या भेटीची सर्वत्र चर्चा रंगली असतानाच आता या भेटीचे नेमके कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.

मागील अनेक दिवसांपासून देशाचे राजकारण उद्योगपती गौतम अदानींच्या मुद्द्यावरून चिघळत चालले आहे. अदानींच्या शेल कंपन्यांमधील २० हजार कोटी रुपयांवरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशी व्हावी अशी मागणीही करण्यात आली होती. मात्र, अदानींच्या जेपीसी चौकशी मागणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोध दर्शवला होता. अशातच आज गौतम अदानी यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांची भेट घेतली. शरद पवार आणि गौतम अदानी यांच्या या भेटीची सर्वत्र चर्चा रंगली असतानाच आता या भेटीचे नेमके कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. (NCP Jitendra Awhad reaction on Sharad Pawar Adani meeting told the reason for the meeting)

नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

- Advertisement -

“या भेटीमागे कुठलाही गैर अर्थ काढू नये. शरद पवार यांचे सर्वच उद्योगपतींची चांगले संबंध आहेत. त्यामुळे अदानी आणि शरद पवार यांची भेट होणे विशेष गोष्ट नाही. शरद पवार यांनी बऱ्याच मोठ्या उद्योगपतींच्या घरातील वाद सोडवले आहेत. देशाच्या संसदेत ६० वर्षे सदस्य असलेला एकमेव प्रतिनिधी म्हणजे शरद पवार आहेत. त्यामुळेच, ते अनुभवी व्यक्तिमत्व असल्याने सर्व मंडळी त्यांच्याकडे येत असतात”, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

दरम्यान, अदानी समुहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर येत शरद पवार यांची भेट घेतली. अदानी आणि शरद पवार यांच्यातील ही भेट सुमारे दोन तास चालली.

- Advertisement -

हिंडेनबर्ग रिपोर्ट आणि चौफेर राजकीय आरोपांमुळे अदानी हे अडचणीत आले असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी त्यांचा बचाव केला होता. दरम्यान, आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गौतम अदानी सिल्व्हर ओकवर आल्याने चर्चांना उधाण आले आहे.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील – राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -