घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील - राज ठाकरे

मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा, अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील – राज ठाकरे

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वरळी बीडीडी चाळ पुर्नवसन, सिडको गृहनिर्माण लॉटरी, कलेक्टर लँडवरील शासकीय घरांचा प्रश्न, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, मराठी शाळा, शेतकरी मदत यासंह अनेक विषयांवरील प्रलंबित मागण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे एकनाथ शिंदेंची भेट घेतली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वरळी बीडीडी चाळ पुर्नवसन, सिडको गृहनिर्माण लॉटरी, कलेक्टर लँडवरील शासकीय घरांचा प्रश्न, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक, मराठी शाळा, शेतकरी मदत यासंह अनेक विषयांवरील प्रलंबित मागण्यासाठी सह्याद्री अतिथीगृह येथे एकनाथ शिंदेंची भेट घेतली. (MNS Chief Raj Thackeray meets cm eknath shinde at Sahyadri guest house)

यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे राज ठाकरेंनी सांगितले. तसेच, अनेक प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील असे यावेळी राज ठाकरेंनी सांगितले. अनेक विषय प्रलंबित होते. त्या सर्व विषयां संबंधीतली शिष्ठमंडळी मी आज सह्याद्री अतिथीगृहावर बोलवली होती, असेही यावेळी ठाकरेंनी सांगितले.

- Advertisement -

ठाकरे-शिंदे भेटीतील प्रमुख मुद्दे :

वरळी बीडीडी चाळ पुर्नवसन

वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रश्नावर चर्चा केली. वरळी बीडीडी चाळीतील लोकांना माहिती नाही की, त्याठिकाणी नेमके काय होणार आहे. किती स्क्वेअर फुटांची घरं होणार, हा परिसर मोठा असून, या ठिकाणी रुग्णालय होणार आहे का, शाळा, मैदान होणार आहे का, याबाबत काहीच कल्पना बीडीडी चाळीतील लोकांना नाहीये. त्यामुळे यासंदर्भात लवकरच प्रेझेंटेशन वरळी बीडीडी चाळीतील लोकांसमोर होईल, त्यानंतर त्यांना या प्रकल्पाबाबत सर्व माहिती मिळेल.

- Advertisement -

सिडको गृहनिर्माण लॉटरी

सिडको गृहनिर्माण लॉटरीमधील घरांच्या वाढीव किंमतीबाबत चर्चा झाली. सिडको गृहनिर्माण लॉटरीमधील घरांच्या किंमती 22 लाखांहून 35 लाखांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्या किंमती पुन्हा 22 लाखांवर आण्याव्यात याबाबत उद्या एक सिडकोच्या अधिकाऱ्यांशी बैठक होईल आणि मार्ग निघेल. पोलिसांच्या घरांबाबतही उद्या बैठक होणार आहे.

कलेक्टर लँडवरील शासकीय घरांचा प्रश्न

कलेक्टर लँडवरील शासकीय घरांचा प्रश्नावर चर्चा झाली. कलेक्टर लँडवरील असलेल्या अनेक इमारती जिर्णावस्थेत आहेत. त्यामुळे त्या इमारतीचा तात्काळ पुर्नविकास कसा करता येईल याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित एक पॉलिस करणार आहेत.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संदर्भात शेतकऱ्यांच्या मागे जो तकादा लावला आहे. तो आजपासून बंद होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. बोर्डासमोर फोटो काढणे आजपासून बंद होईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधीतांना आदेश दिले आहेत.

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्री शेतकऱ्यांसाठी आदेश काढले जातील. तसेच, फुलमार्केटमधील महिला कोळीबांधवांना क्रॉफर्डमार्केटमध्ये स्थलांतरीत करण्यात येणार आहेत.


हेही वाचा – बाळासाहेब अयोध्येला गेले होते हे काहींना पुन्हा दाखवावं लागणार आहे – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -