घरताज्या घडामोडीजयंत पाटलांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा; अडीच लाख लग्नपत्रिका, तर भव्य मंडपाची तयारी...

जयंत पाटलांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा; अडीच लाख लग्नपत्रिका, तर भव्य मंडपाची तयारी सुरू

Subscribe

मागील काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांची मुलं व मुली लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतीक पाटील विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रतीक पाटील यांचा विवाहसोहळा सांगलीतील इस्लामपूरात येथे होणार असून, त्याठिकाणी जोरदार तयारीला सुरूवात झाली आहे.

मागील काही महिन्यांपासून राजकीय नेत्यांची मुलं व मुली लग्नबंधनात अडकत आहेत. अशातच आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रतीक पाटील विवाहबंधनात अडकणार आहेत. प्रतीक पाटील यांचा विवाहसोहळा सांगलीतील इस्लामपूरात येथे होणार असून, त्याठिकाणी जोरदार तयारीला सुरूवात झाली आहे. प्रतीक पाटील यांच्या लग्नासाठी तब्बल 2 लाख लग्नपत्रिका छापण्यात आल्या आहेत. (NCP leader jayant patils son prateek patil will get married to industrialist rahul kirloskars daughter in islampur)

या विवाहसोहळ्यासाठी हजारो चौरस फुटांचा शाही शामियाना उभारण्याचे काम सुरू आहे. परिसरातील रस्ते चकाचक करण्यात आले आहे. त्याचबरोबर एकाचवेळी हजारो लोकांच्या स्वागताची आणि जेवणाच्या व्यवस्थेची तयारी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचे उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांच्या मुलीसोबत उद्या (रविवारी) शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

- Advertisement -

इस्लामपूरात गेल्या महिन्याभरापासून प्रतीक पाटील यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे. मंडपाची उभारणी आणि पाहुण्यांच्या जेवणाची व्यवस्थेशिवाय अन्य धार्मिक विधीही पारंपारिक धार्मिक संगीताच्या तालावर सुरू आहेत.

प्रतीक पाटलांच्या विवाहासाठी राजारामनगरमध्ये भव्य मंडप उभारण्यात आला आहे. शामियान्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी खास तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर एक मंदिर आणि घंटा सजावट स्वरुपात उभारण्यात आली आहे. त्याचबरोबर राजारामनगरमधील बियाणे मळा परिसरात लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून एकाचवेळी पाच हजार लोक जेवण करू शकतात, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

प्रतीक पाटलांच्या विवाहासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सु्प्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंसह अनेक आमदार-खासदारांसह विविध साखर कारखाने आणि सहकारी संस्थांचे अध्यक्ष हजेरी लावणार आहेत. त्यामुळं या लग्नसोहळ्यात या दिग्गज नेत्यांच्या स्वागतासाठी इस्लामपूरात जोरदार तयारी सुरू आहे.


हेही वाचा – कामाख्या देवी जागृत.., गुवाहाटी विमानतळावर पाऊल ठेवताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -