घरताज्या घडामोडीराष्ट्रवादी नेत्याने भाजपसोबत जाण्याचे राऊतांना सांगितले खरे कारण; 'आम्हाला चक्की पिसायला...'

राष्ट्रवादी नेत्याने भाजपसोबत जाण्याचे राऊतांना सांगितले खरे कारण; ‘आम्हाला चक्की पिसायला…’

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अजित पवार यांच्यासह काही नेते शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी झाले. या नेत्यांना तुरुंगात जाण्याची भीती होती. आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही, त्यामुळे भाजपसोबत गेलो, अशी स्पष्ट कबुली यातील एका नेत्याने शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याकडे दिली आहे. बंगळुरुला जाण्याआधी ही भेट झाली. बंगळुरुत दिलदार इंडियाचं नवं रोपटं लावण्यात आलं आहे, 2024 पर्यंत त्याचा महावृक्ष होणार असल्याचा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

“देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता व संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय?” संजय राऊत यांच्या या प्रश्नावर राष्ट्रवादीतून भाजपसोबत जाऊन मिळालेल्या एका नेत्याने त्यांना उत्तर दिले, “चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.” राऊत यांनी त्यांच्या ‘रोखठोक’ या सदरातून या भेटीचा आणि संवादाचा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे नेत्याला दिल्लीच्या सत्तेची किती भीती आहे, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते, असेही राऊतांनी म्हटले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन २ जुलै रोजी अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत हातमिळवणी करुन घेत राज्याचे उपमुख्यमंत्री पद मिळवले. अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार प्रफुल्ल पटेल, लोकसभा सदस्य सुनील तटकरे देखील गेले आहेत. त्यासोबतच अजित पवारांसोबत गेलेल्या आठ नेत्यांना मंत्रीपद मिळाले आहे. यातील एका नेत्याची शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याशी मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. खासदार राऊत हे १८ जुलैला बंगळुरुमध्ये होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीसाठी निघाले होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये होणाऱ्या एनडीएच्या बैठकीसाठी निघाले होते. या दोन्ही नेत्यांमध्ये झालेली चर्चा राऊत यांनी त्यांच्या रोखठोक सदरामध्ये सविस्तरपणे मांडली आहे.

हेही वाचा : संजय राऊतांच्या निशाण्यावर आता अण्णा हजारे, म्हणाले…

- Advertisement -

विरोधकांच्या एकजुटीने आता काय होणार, असा राष्ट्रवादी नेत्याचा सूर असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्याला उत्तर देताना राऊतांनी म्हटले, “काय होणार? ते शेवटी जनताच ठरवेल. मोदी ज्यांना स्वतःचे वैयक्तिक शत्रू समजतात त्या सगळ्या देशभक्त पक्षांचे ऐक्य व्हावे, त्यांचे नेते एकत्र राहावेत अशी संपूर्ण देशाची इच्छा आहे. त्यांचा तुम्ही भ्रमनिरास केला आहात.” त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्याचा सवाल होता, “विरोधी पक्षाचे ऐक्य आता कशासाठी? मोदींचा पराभव का करायचा?”
त्याला राऊतांनी उत्तर दिले.. “देशातील हुकूमशाही संपवून लोकशाही टिकविण्यासाठी आज सत्तेचे, संपत्तीचे विकेंद्रीकरण पूर्णपणे संपले आहे. सत्ता व संपत्ती फक्त दोन-चार लोकांच्याच हाती एकवटली आहे. हे चित्र तुम्हाला पटते काय?” हे चित्र पटत नसल्याचे मान्य करत भाजपसोबत गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने म्हटले, “चित्र चांगले नाही, पण आम्हाला चक्की पिसायला जायचे नाही… त्यामुळे मोदी हवेत.”
राऊतांनी पुढे लिहिले, “2024 मध्ये मोदी जातील हे नक्की! त्यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेस नेता) मनात दिल्लीच्या सत्तेविषयी भीती होती. हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते.” असेही राऊत यांनी म्हटले आहे.

विरोधकांच्या एकजुटीला घाबरूनच भाजप नेत्यांनी एनडीएचा जीर्णोद्धार केला असल्याचा टोलाही राऊत यांनी त्यांच्या सदरातून भाजपला लगावला आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादीच्या आमदाराला उदय सामंताचा थेट इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -