घरमहाराष्ट्रभाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत; 'या' प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल

भाजप नेत्या चित्रा वाघ अडचणीत; ‘या’ प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल

Subscribe

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या चित्रा वाघ यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. चित्रा वाघ यांनी 2021 रोजी मेहबूब शेख यांचा उल्लेख बलात्कारी म्हणून केला होता. यावरून आता मेहबूब शेख यांनी शिरुर पोलीस ठाण्यात चित्रा वाघ यांच्याविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बदनामीकारक विधान केल्याचा दावा शेख यांनी केला आहे.

मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबादेतील एक व्यक्तीने बलात्काराचा आरोप केला होता, यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करत गंभीर आरोप केले. या प्रकरणी मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्याविरोधात बीड न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

दरम्यान शिरुर कासार न्यायालयाने आता मेहबूब शेख यांचा दावा स्वीकारला आहे. शेख यांनी 50 लाख रुपयांचा दावा दाखल केला आहे. या अब्रूनुकसानीच्या दाव्यामुळे आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे.

मेहबूब शेख हे महाविकास आघाडी सरकारचे नेते असल्याचे म्हणत, मविआ सरकारच्या काळात मेहबूब शेख यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. चित्रा वाघ यांच्या आरोपांमुळे आता मेहबूब शेख यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

चित्रा वाघ राज्यातील महिलांविरोधातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत असतात. यात राज्यातील मविआ सरकारमधील नेत्यांविरोधातील गुन्हांनाही चित्रा वाघ यांनी लावून धरले होते.


अजित पवारांना मोठा दिलासा, ‘जरंडेश्वर’वरची आयकराची जप्ती टळली

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -