घरलाईफस्टाईलBeauty Tips : एका तुरटीचे आहेत अगणित फायदे, तुम्ही आवश्य वापरून बघा...

Beauty Tips : एका तुरटीचे आहेत अगणित फायदे, तुम्ही आवश्य वापरून बघा…

Subscribe

आपल्या घरामध्ये औषधोपयोगी अनेक साधनं उपलब्ध असतात. परंतु आपल्याला त्याचा नेमका वापर माहिती नसतो. प्रामुख्याने सर्वांच्याच घरामध्ये असणाऱ्या तुरटीचेही अनेक उपयोग आहेत. पाणी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुरटीचे केंसांसाठी त्वचेसाठीही अनेक फायदे होतात. तुरटीमध्ये मॅग्नेशियम सल्फेट असते. त्याचा उपयोग विविध कारणांसाठी केला जातो.

तुरटीचे 5 गुणकारी फायदे

- Advertisement -

फिटकरी पानी पीने के फायदे, नुकसान व बनाने का तरीका

 

- Advertisement -
  • तोंडातील दुर्गंध आणि दातांसाठी गुणकारी
    एक ग्लास गरम पाण्यात चिमूटभर मीठ व एक लहानसा चमचा तुरटी पावडर घालून मिक्स करावे. हे पाणी गार झाल्यावर या पाण्याने गुळण्या केल्यास दातावरील किड कमी होते. शिवाय तोंडाला एक प्रकारची दुर्गंधी येत असल्यास ती हळूहळू नाहीशी होऊन तोंडाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • सुंदर पायांसाठी
    बऱ्याच जणांचे पाय काळवंडलेले आणि त्यावरील त्वचा फाटलेली असते. अशावेळी कोमट पाण्यात तुरटी फिरवून त्या पाण्यात 15 ते 20 मिनिटे पाय बुडवून ठेवल्यास पायांच्या त्वचेमध्ये फरक झालेला दिसून येतो.
  • ताप, खोकल्यावर फायदेशीर
    वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला यासारख्या समस्या वाढू लागतात. अशावेळी रात्री झोपताना एक ग्लास दुधामध्ये 10 ग्रॅम खडी साखर व 2 चिमूट तुरटीची पूड एकत्र करून घ्यावी. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.
  • केसांसाठी फायदेशीर
    अनेकांना तरुण वयातच पांढऱ्या केसांच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशावेळी तुरटीची बारीक पूड करून, तुम्ही केसांना लावत असणाऱ्या तेलामध्ये ते थोडेसे कोमट करून, त्यात मिसळावी. अर्धा तासांनी ही पूड त्या तेलामध्ये चांगलीच विरघळलेली दिसेल. मग या तेलाने डोक्याला मसाज करावा. नंतर नेहमीप्रमाणे केस धुऊन टाकावे. महिन्यातून 2-3 वेळा हा उपचार केल्यास हळूहळू पांढऱ्या केसांची समस्या कमी झालेली दिसेल. तसेच सतत डोक्याला खाज निर्माण होण्याच्या समस्येपासून सुटकारा मिळतो.
  • चेहऱ्यावरील त्वचा चमकदार करण्यासाठी
    तुरटीची पूड करून त्यात थोडे गुलाबजल टाकून, त्याची दाट पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहरा धुवून त्यावर लावावी. 10-15 मिनिटे ठेवून मग चेहरा साध्या पाण्याने धुवून टाकावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमची त्वचा उजळलेली दिसेल.

हेही वाचा :

दाट ‘आयब्रो’साठी वापरा या टीप्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -