घर महाराष्ट्र NMML : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नेहरू स्मारकाचं नाव बदललं, आता 'या'...

NMML : केंद्र सरकारचा मोठा निर्णय; नेहरू स्मारकाचं नाव बदललं, आता ‘या’ नावानं ओळखलं जाणार

Subscribe

नेहरू स्मारकाला पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (PMML)म्हटले जाईल. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता करण्यात आली आहे. नृपेंद मिश्रा हे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत.

स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत नेहरू स्मारकाचे नाव बदलले आहे. यापुढे नेहरू स्मारकाला पंतप्रधान म्युझियम अँड लायब्ररी (PMML)म्हटले जाईल. स्वातंत्र्यदिनी नाव बदलण्याची औपचारिकता करण्यात आली आहे. नृपेंद मिश्रा हे पंतप्रधान म्युझियम आणि लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. ( Nehru Memorial Museum and Library NMML officially renamed as the prime minister museum and library society with effect from 14 th August )

नृपेंद्र मिश्रा यापूर्वी पंतप्रधान मोदींचे मुख्य सचिव होते. जून महिन्यात नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी सोसायटीच्या विशेष बैठकीत त्याचे नाव बदलून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता त्याची औपचारिकता झाली आहे. PMMLचे उपाध्यक्ष ए सूर्य प्रकाश यांनी ट्विटरवर नाव बदलल्याची पुष्टी केली.

- Advertisement -

PMML चे उपाध्यक्ष ए सूर्य प्रकाश यांनी ट्वीटमध्ये लिहिलयं की, नेहरू ममोरियल म्युझियम अँड लायब्ररी आता 14 ऑगस्ट 2023 पासून पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटी आहे, समाजाच्या कार्यक्षेत्रातील लोकशाहीकरण आणि विविधीकरणाच्या अनुषंगाने. स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. जूनच्या मध्यात NMML सोसायटीच्या विशेष बैठकीत तिचे नाव बदलून PMML सोसायटी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाव का बदललं?

संस्थेचं नाव स्वतंत्र भारतातील लोकशाहीचा एकत्रित प्रवास आणि राष्ट्र उभारणीत प्रत्येक पंतप्रधानाचे योगदान दर्शवणाऱ्या नवीन संग्रहालयासह चालू उपक्रमांचे प्रतिबिंब असावं, असं पीएम म्युझियम अँड लायब्ररीच्या कार्यकारी परिषदेला वाटत होतं. त्यानंतर नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. संग्रहालय आता अद्यायावर करण्यात आलं आहे.

काँग्रसेकडून निषेध

- Advertisement -

नेहरू मेमोरियल म्यूजियमचं नाव बदलल्याने काँग्रेसने भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ज्यांचा कोणताही इतिहास नाही, ते दुसऱ्यांचा इतिहास मिटवत आहेत. परंतु नाव बदलल्याने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाला नेहरू यांचं महत्त्व कमी होणार नाही, असं काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी म्हटलं आहे.

( हेही वाचा: …तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद, भाजपची अट; वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ )

भाजपचा पलटवार

मल्लिकार्जून खर्गे यांच्या वक्तव्यावर भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. बिगर काँग्रेसी नेतेही देशासाठी योगदान देत आहेत, हे काँग्रेसला पचवता येत नाही, असं ते म्हणाले होते. पीएम म्युझियम हा राजकारणाच्या पलिकडचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले होते.

 

- Advertisment -