Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र ...तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद, भाजपची अट; वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ

…तरच अजितदादांना मुख्यमंत्रीपद, भाजपची अट; वडेट्टीवारांच्या दाव्यानं खळबळ

Subscribe

अजित पवार गट हा राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत जाऊन बसला आहे. परंतु शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल,अशी अट भाजपनं ठेवल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अजित पवार गट हा राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्तेत जाऊन बसला आहे. परंतु शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री पद दिलं जाईल,अशी अट भाजपनं ठेवल्याचा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते टीव्ही 9 या वृत्तवाहिनिशी बोलत होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ( Then only Ajit Pawar become Chief Minister BJP took condition Excitement due to Vijay Wadettiwars claim )

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात होतं. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शरद पवार आणि अजित पवार भेटीनं संभ्रम निर्माण झालेला नाही. शेवटी ते काका- पुतण्यात आहेत. या भेटीत कोणाची तरी गरज आहे. जो भेटायला जातो त्याचीच गरज असते. कारण, भाजपने अजित पवार यांच्यासमोर एक अट ठेवलेली दिसतेय. शरद पवार भाजपसोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्री पद देऊ अन्यथा मुख्यमंत्री पदाची नुसती स्वप्नच बघा, असं कदाचित सांगितलं असावं, म्हणून अजित पवार शरद पवारांना भेटत असतील, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यांच्या या दाव्याची सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे.

काय म्हणाले वडेट्टीवार?

- Advertisement -

अजित पवार शरद पवारांना भेटणं म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी, तशीच ती टिकवण्यासाठी चाललेला हा खेळ आहे. इथे विचारांना, विकासाला तिलांजली दिली आहे. इथे महत्त्व हे केवळ खुर्चीला आहे. हे या सर्व घडामोडींतून दिसत आहे. भाड मे जाए जनता, हम खुर्ची पर बने रहे, हेच सर्व या राज्यात सुरू आहे. पण भाड में जाए जनता म्हणालं, तर जनता तुम्हाला खुर्चीला लाथ मारून खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. हेही या लोकांनी लक्षात ठेवावे,असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपसहित अजित पवार गटालाही सुनावलं आहे.

अजित पवार शरद पवारांना भेटणं म्हणजे सत्ता मिळवण्यासाठी, तशीच ती टिकवण्यासाठी चाललेला हा खेळ आहे. इथे विचारांना, विकासाला तिलांजली दिली आहे. इथे महत्त्व हे केवळ खुर्चीला आहे. हे या सर्व घडामोडींतून दिसत आहे. भाड मे जाए जनता, हम खुर्ची पर बने रहे, हेच सर्व या राज्यात सुरू आहे. पण भाड में जाए जनता म्हणाल, तर जनता तुम्हाला खुर्चीला लाथ मारून खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. हेही या लोकांनी लक्षात ठेवावे, असं म्हणत वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला.

काँग्रेसचा प्लॅन बी

- Advertisement -

शरद पवार भाजपसोबत गेले तर काही प्लॅन बी आहे का ? यावर उत्तर देताना वडेट्टीवार म्हणाले की, इंडिया आघाडीचे शरद पवार हे सहआयोजक आहेत. त्यांनी आतापर्यंत या आघाडीला केलेलं मार्गदर्शन तसंच, त्यांची भूमिका यावरून वाटत नाही, शरद पवार भाजपसोबत जातील. तसंच, पवार हे 1 तारखेला आपली भूमिका स्पष्ट करतील.  प्लॅन बी म्हणण्यापेक्षा जो तो पक्ष निवडणुकांच्यादृष्टीने कामाला लागलेला आहे. प्लॅन तयारच असतात. आघाडी झाली तर प्लॅन ए असतो. नाही झाली तर दोन पक्ष एकत्र तेही नाही झालं तर कॉँग्रेस सी, असं वडेट्टीवार म्हणाले. तसंच, निवडणुकांपासून कोणताही पक्ष दूर राहू शकत नाही. त्यामुळे त्याची तयारी तर करावीच लागते. परंतु, आम्हाला विश्वास आहे, शरद पवार हे कोणतंही पाऊल आघाडीच्या विरोधात घेणार नाहीत, असा विश्वास वडेट्टीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisment -