घरमहाराष्ट्रSanjay Raut : देश 'त्या' शुभ घटनेची वाट पाहतोय, संजय राऊतांचा आशावाद

Sanjay Raut : देश ‘त्या’ शुभ घटनेची वाट पाहतोय, संजय राऊतांचा आशावाद

Subscribe

लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. पण यावेळी मोदींनी ध्वजारोहण केल्यानंतर ध्वज फडकलाच गेला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

मुंबई : काल (ता. 15 ऑगस्ट) लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. पण यावेळी मोदींनी ध्वजारोहण केल्यानंतर ध्वज फडकलाच गेला नाही. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ध्वज न फडकणे हा शुभ संकेत तर नक्कीच नाही. त्यामुळे 2024 मध्ये INDIA आघाडीचा पंतप्रधानच लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करेल, अशी आशा राऊतांकडून व्यक्त करण्यात आली आहे. (Sanjay Raut believes that Prime Minister of India alliance will hoist flag in 2024)

हेही वाचा – अजित पवार काही मोठे नेते नाहीत, शरद पवार भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

- Advertisement -

प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, लाल किल्ल्यावर ध्वज फडकला गेला नाही, हे मी सुद्धा व्हिडीओमध्ये पाहिले आहे. त्यामुळे हा शुभ संकेत तर नक्कीच नाही. 2024 चा झेंडा हा इंडिया आघाडीचे जे कोणी पंतप्रधान होतील, त्यांच्याकडून फडकविण्यात येईल. देश त्या शुभ घटनेची वाट पाहत आहे, असा आशावाद राऊतांकडून व्यक्त करण्यात आला.

तसेच, पंतप्रधान मोदी यांच्याशी आमचे काही वैयक्तिक वैर नाही. पण ते ज्या प्रकारे बिनबुडाचे, बदल्याचे राजकारण करत आहेत. त्यामुळे विरोधकांना एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. 2024 च्या निवडणुका आम्ही जिंकू. इंडियाचे सरकार येईल. पुढचा स्वातंत्र्य दिनाचा लाल किल्ल्यावरचा सोहळा नरेंद्र मोदीजी गुजरातमध्ये आपल्या घरी बसून पाहतील किंवा माजी पंतप्रधान म्हणून समोर बसून पाहतील. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोला संजय राऊतांना लगावला आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी नवाब मलिक यांची पुढील दोन ते तीन दिवसात भेट घेणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले की, नवाब मलिकांना काही काळ कुटुंबासोबत राहू द्यात, त्यांना त्यांचा वेळ एकत्र घालवू द्या. पुढील दोन तीन दिवसांत मी त्यांची भेट घेणार आहे. ते जेव्हापासून तुरुंगात होते, तेव्हा पासून त्यांचे कुटुंबिय चिंतेत होते. राजकारण आयुष्यभर करायचे आहे, त्यामुळे त्यांना आता त्यांचा वेळ घेऊ द्या, असे राऊतांनी पत्रकारांना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -