घरमहाराष्ट्ररश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; कोर्टाचे थेट केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात नवा ट्विस्ट; कोर्टाचे थेट केंद्रीय गृहमंत्रालयाला आदेश

Subscribe

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीही या प्रकरणात सुनावणी झाली होती. तेव्हाही कोर्टानं देवेंद्र फडणवीसांकडे ही कागदपत्र आली कुठून असा प्रश्न उपस्थित केला होता. गोपनीय दस्तावेज एसआयटी ऑफिसमधून देवेंद्र फडणवीसांच्या हाती कसे काय आले, याचा तपास मुंबई सायबर करत आहे.

मुंबई : रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात 10 दिवसांत पेन ड्राईव्ह, कागदपत्र महाराष्ट्र सायबर सेलला द्या, असे आदेश मुंबईतल्या किल्ला कोर्टानं केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पेन ड्राईव्ह, कागदपत्रे दिली होती, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर किल्ला कोर्टानं हा निर्णय दिल्यानं देवेंद्र फडणवीसांची अडचण वाढणार आहे.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वीही या प्रकरणात सुनावणी झाली होती. तेव्हाही कोर्टानं देवेंद्र फडणवीसांकडे ही कागदपत्र आली कुठून असा प्रश्न उपस्थित केला होता. गोपनीय दस्तावेज एसआयटी ऑफिसमधून देवेंद्र फडणवीसांच्या हाती कसे काय आले, याचा तपास मुंबई सायबर करत आहे. एवढे गोपनीय दस्तावेज कसे काय लीक झाले. त्यात वकिलांनी काही फोटोसुद्धा कोर्टात दाखवले असून, देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. कशा पद्धतीने डॉक्युमेंट आणि पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीसांना मिळाले. कोणी तरी एसआयटीच्या ऑफिसमधून दस्तावेज चोरी करून देवेंद्र फडणवीसांना दिलेत, अशी माहिती कोर्टात देण्यात आलीय. या प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचा जबाब नोंदवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी त्यांना चारदा समन्स बजावण्यात आल्याचं कोर्टात सांगितलं होतं.

- Advertisement -

गोपनीय माहिती देवेंद्र फडणवीसांना राज गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनीच दिली, अशी माहिती मुंबई सायबर सेलच्या वकिलांनी कोर्टात दिली होती. रश्मी शुक्ला त्यावेळी राज्य गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या. तर देवेंद्र फडणवीस या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार आहेत. त्यांना चार वेळा जबाब नोंदवण्यासाठी बोलावले. पण ते आले नाहीत, असं मुंबई सायबर सेलच्या वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं.

देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले

दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फोन टॅपिंगप्रकरणी देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. मला सायबर सेलनं अद्याप साक्षीसाठी बोलावलेलं नाही, असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय. सायबर सेलनं एक प्रश्नावली पाठवली आणि त्यानंतर एक पत्र पाठवल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -