घरताज्या घडामोडीCongress Party Foundation Day: PHOTO | काँग्रेसचा १३७ वा स्थापना दिवसानिमित्त मुंबईत...

Congress Party Foundation Day: PHOTO | काँग्रेसचा १३७ वा स्थापना दिवसानिमित्त मुंबईत भव्य कार्यक्रम

Subscribe

काँग्रेस पक्षाचे आज देशभर १३७ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.काँग्रेस कार्यकर्त्यांनी हा दिवस संकल्प दिवस म्हणून साजरा केला.या स्थापना दिवसाच्या दिवशी मुंबईतही भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काँग्रेसची स्थापना ही २८ डिसेंबर १८८५ मध्ये ब्रिटिश राजवटीत झाली.मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील ७२ प्रतिनिधी एकत्र आले आणि काँग्रेसची स्थापना केली.आज या स्थापना दिवशी मुंबईच्या तेजपाल हॉल येथे ध्वजारोहण करण्यात आले.या कार्यक्रमात मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप,माणिकराव ठाकरे,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ,चरणसिंग सप्रा,बाळासाहेब थोरात ,अशोक चव्हाण,अस्लम शेख आदि पदाधिकारी उपस्थित होते.ऑगस्ट क्रांती मैदानावर सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. (छाया : दीपक साळवी)


हे ही वाचा – कोण अजित पवार?, मी त्यांना ओळखत नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -