घरमहाराष्ट्रइसिसच्या चार संशयित तरुणांना अटक; मुंबईसह ठाणे, पुण्यात NIA कारवाई

इसिसच्या चार संशयित तरुणांना अटक; मुंबईसह ठाणे, पुण्यात NIA कारवाई

Subscribe

मुंबई: इसिसशी संबंधित असलेल्या चार संशयित तरुणांना मुंबईसह ठाणे, पुण्यातून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केली. या कारवाईत काही महत्त्वाचे आक्षेपार्ह दस्तावेज हस्तगत करण्यात आले आहे. त्यामुळे या चौघांची कसून चौकशी करण्यात येत आहे. ताबिश नासेर सिद्धीकी, जुबेर नूरमोहम्मद शेख ऊर्फ अबू नुसेवा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला अशी या चौघांची नावे आहेत. यातील ताबिशला मुंबई, जुबेरला पुण्यातून तर शरजील आणि झुल्फिकारला ठाण्याच्या पडघा येथून ताब्यात घेण्यात आले.

इस्मालिक स्टेट ऑफ इराक ऍण्ड सिरीया (इसिस) या अतिरेकी संघटनेशी काही संशयित मुंबईसह ठाणे आणि पुण्यात कार्यरत असल्याची माहिती एनआयएच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. याच प्रकरणात नंतर पाच ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यात या अधिकार्‍यांना मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रीक गॅझेट्स, इसिसशी संबंधित अनेक आक्षेपार्ह दस्तावेज सापडले होते. या दस्तावेजावरुन संबंधित संशयित आरोपी इसिसच्या संपर्कात असल्याचे, भारतविरोधी अजेंडा पुढे नेण्यासाठी असुरक्षित तरुणांना प्रवृत्त करुन त्यांना भारताविरोधी भडकावित असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे या आरोपींच्या अटकेसाठी संबंधित अधिकार्‍यांनी गुप्तपणे माहिती काढून त्यांचा शोध सुरु केला होता.

- Advertisement -

हेही वाचाःप्रदीप कुरुलकरांच्या विरोधात 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल

ही शोधमोहीम सुरु असताना २८ जूनला नागपाडा परिसरातून ताबिश या सशयित तरुणाला या अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. त्याच्या मोबाईलवरुन तो इसिसमधील अमीर नावाच्या एका व्यक्तीच्या नियमित संपर्कात असल्याचे उघडकीस आले. त्याने इसिसच्या व्हाईस ऑफ हिंद या मासिकात एक लेख लिहिला होता. हा लेख मासिकात प्रसिद्ध झाला होता. विशेष म्हणजे तो नागपाडा येथील एटीएस मुख्यालयापासून काही अंतरावर वास्तव्यास होता, मात्र त्याच्याविषयी एटीएसला काहीच माहिती नव्हती. तेथून तो इसिसच्या काही लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्यासाठी काम करत होता. त्यानंतर पुण्यातील कोंढवा आणि ठाण्यातील पडघा येथून अशाच प्रकारे कारवाई करुन तिघांना ताब्यात घेतले. ते तिघेही इसिसशी संबंधित असून ताबिजच्या संपर्कात होते. ताबिजच्या ओळखीनंतर ते इसिसच्या इतर संशयित अतिरेक्यांच्या संपर्कात आले होते.

- Advertisement -

गझवा-ए-हिंद गटावर कारवाई

पुण्यातील कोंढवा, वजीर कस्केड सोसायटीमधून ताब्यात घेण्यात आलेला जुबेर शेख हा इसिसच्या शिमोगा कर्नाटक मोड्युलसोबत काम करत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. रविवारी एनआयएने बिहारच्या दरभंगा, पटना, उत्तरप्रदेशातील बरेली, गुजरातच्या सुरत येथून पाकिस्तानद्वारे चालविणार्‍या जाणार्‍या गझवा-ए-हिंद नावाच्या कट्टरपंथी गटाशी संबंधित अनेक ठिकाणी कारवाई केली होती. या कारवाईनंतर मुंबई, ठाणे आणि पुण्यात एकाच वेळेस ही कारवाई करण्यात आली आहे. भारतातील मुस्लिम तरुणांचे ब्रेनवॉश करुन त्यांना कट्टरपंथी बनविण्याच्या उद्देशाने त्यांना प्रशिक्षण करण्याचे काम सोपविण्यात आले.

शस्त्र बनवण्याचे दिले प्रशिक्षण

पाकिस्तानच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून भारतासह पाकिस्तानी, बांगलादेशी आणि येमेनी नागरिकांना इसिसशी जोडण्यासाठी, देशात स्लिपर सेल तयार करण्याचा त्यांचा मनसुबा होता. ते सर्वजण इंटाग्राम आणि व्हॉटअपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. गझवा-ए-हिंदने त्यासाठी विविध मिडीया ग्रुप तयार करुन या ग्रुपच्या मदतीने मुस्लिम तरुणांना सामिल करुन घेतले होते. संघटनेचा प्रचार करुन ते सर्वजण पाकिस्तानच्या हॅडलर्सच्या संपर्कात राहून त्यांच्या आदेशाप्रमाणे भारतात काम करत होते. देशाची एकता, अखंडता, सुरक्षा आणि सार्वभौम भंग करण्याची त्यांची योजना होती. इसिसच्या कटाचा एक भाग म्हणून स्लिपर सेल तयार करुन भारत सारकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा ते चौघेही तयारीत असल्याचे उघडकीस आले. या चौघांनी काही मुस्लिम तरुणांनाा आयईडी आणि शस्त्रे बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. या चौघांची सध्या एनआयएकडून कसून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -