घरक्राइमHoney Trap Case : प्रदीप कुरुलकरांच्या विरोधात 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल

Honey Trap Case : प्रदीप कुरुलकरांच्या विरोधात 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल

Subscribe

हनीट्रॅप प्रकरणी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपात अटकेत असलेले डीआरडीओचे संचालक व वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांच्याविरोधीत 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. दहशतवादी विरोधी पथकाने प्रदीप कुरुलकर यांच्या विरोधात पुणे न्यायालयात 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल केले आहे. तसेच कुरुलकरांची पॉलिग्राफ आणि व्हॉइस क्लीअर अँड सायकॉलॉजिकल टेस्ट करण्यास परवानगी देण्याची मागणीही एटीएसकडून न्यायालयात करण्यात आली आहे. या मागणीवर आता 7 जुलैला सुनावणी होणार आहे.

2 हजार पानांचे चार्जशीट दाखल

डीआरडीओचे संचालक प्रदीप कुरुलकर हे सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी तरुणी झारा दास गुत्ता हिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकले होते. कुरुलकर हे मोबाईल, लॅपटॉप आणि सोशल मीडियाच्या इतर माध्यमातून आरोपी झारा दास गुप्ता हिच्यासोबत अश्लील चाळे करत संपर्कात आले होते. दरम्यान कुरुलकर यांनी आपला मोबाईल फोन बंद केल्यानंतर पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ता हिने लष्करी अधिकारी शेंडेमार्फत कुरुलकर यांच्याशी संपर्क साधला होता. देशातील आणखीन काही वरिष्ठ अधिकारी पाकिस्तानी तरुणी झारा दास गुप्ताच्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याची प्राथमिक माहिती असून एटीएस त्या पद्धतीने तपास करत आहे.

- Advertisement -

देशभरातील संरक्षण दलाची माहिती पुरवल्याप्रकरणी त्यांना एटीएसने 3 मे ला अटक केली होती. डॉ. प्रदीप कुरूलकर हे नकळतपणे हनी ट्रॅप प्रकरणात अडकले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून या अधिकाऱ्याला पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तो पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. ते गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

कोण आहेत प्रदीप कुरुलकर?

डॉ. प्रदीप कुरुलकर हे संरक्षण क्षेत्रातील मोठे नाव आहे. त्यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या संशोधन आणि विकास आस्थापनेच्या प्रतिष्ठित प्रणाली अभियांत्रिकी प्रयोगशाळेचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. प्रदीप कुरुलकर यांचे क्षेपणास्त्र क्षेत्रात भरीव योगदान आहे.

- Advertisement -

हेही वाचा  : honey trapped: डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात; एटीएसची कोर्टात माहिती


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -