घरमहाराष्ट्रसण-उत्सवांच्या काळात चाचणी परिक्षा घेऊ नये; राज्य सरकारचे पत्रक

सण-उत्सवांच्या काळात चाचणी परिक्षा घेऊ नये; राज्य सरकारचे पत्रक

Subscribe

आता सणांच्या कालावधीत शाळेच्या चाचणी परीक्षा घेऊ नयेत, असे पत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षांचे टेंशन न घेता उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

श्रावण महिना सुरु झाला की सण-उत्सवांनाही सुरुवात होते. मात्र याच काळात शाळा-कॉलेजच्या परीक्षा देखील असतात. परंतू आता सणांच्या कालावधीत शाळेच्या चाचणी परीक्षा घेऊ नयेत, असे पत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षांचे टेंशन न घेता उत्सवाचा आनंद लुटता येणार आहे.

काय आहे शासनाच्या पत्रकात

शासन निर्णय ८ सप्टेंबर २०१५ अन्वये राज्यातील धार्मिक सण आणि उत्सव इ. च्या कालावधीमध्ये परीक्षा घेणे व शाळांना सुट्ट्यांच्या नियोजनाबाबत सविस्तर सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी स्थानिक ठिकाणच्या गरजेनुसार शाळा व्यवस्थापन समिती/ पालक शिक्षण संघ यांच्या सहमतीनुसार व शिपारशीनुसार गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण पर्व, नाताळ, ईद व अन्य सण/ उत्सव कालावधीत चाचणी परीक्षांचे आयोजन करू नये अशा सूचना दिलेल्या आहेत. तसेच राज्य मंडळाच्या शाळांव्यतिरिक्त इतर मंडळांच्या शाळांमध्ये या सूचनांचे पालन होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. तर या संदर्भात शासन निर्णयातील सूचनांचे काटेकोरपणे पालन होण्याबाबतची दक्षता घ्यावी व त्यानुसार गणेशोत्सव, दिवाळी, पर्युषण पर्व, नाताळ, ईद आणि इतर सण-उत्सव कालावधीत चाचणी परीक्षांचे आयोजन न करण्याबाबत सर्व संबंधितांना आपल्या स्तरावरून तात्काळ कळविण्यात यावे, असे पत्रक राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे काढण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -