घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रनांदगावला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

नांदगावला विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Subscribe

शाकंबरी, लेंडी नदीला महापूर

 हवामानाच्या अंदाजानुसार मंगळवारी पहाटेपासूनच विजांच्या कडकटासह नांदगाव शहर व तालुक्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाल्याने शहरातील शाकंबरी व लेंडी नदीला पुन्हा महापूर आला. तर शहरातील विविध भागात पाणी शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नगरपालिकेकडून नदी काठी असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

नांदगाव शहरात गेल्या आठ तारखेला अतिवृष्टी झाल्यामुळे महापूर येऊन अतोनात नुकसान झाले आहे तेव्हापासून तालुक्यात सातत्याने पाऊस पडत आहे. यामुळे गेल्या वीस दिवसांपासून लेंडी आणि शाकंबरी नदीच्या पाण्यात कमी-अधिक प्रमाणात वाढ होत आहे. सतत वीस दिवस दोन्ही नद्या दुथडी भरून पहिल्यांदाच वाहत आहे अनेक जाणकार नागरिकांनी सांगितले आहे की यापूर्वी आम्ही कधीही अशा प्रकारे दोन्ही नद्या दुथडी भरून वाहताना बघितलेल्या नाहीत यावरून शहर व परिसरात किती मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असावा याचा अंदाज येतो.

- Advertisement -

शहरातील इंद्रायणी नगर (चांडक प्लॉट), जय भोले नगर, करीम चाळ या भागांचा गेल्या वीस दिवसांपासून शहराशी असलेला संपर्क तुटलेला आहे. जणू एखाद्या बेटावर वसलेल्या गावाप्रमाणे या ठिकाणचे रहिवाशी आपापल्या घरांमध्ये अडकलेले आहेत. याचप्रमाणे आज आलेल्या पुराचे पाणी गुलजार वाडी, भोंगळे रोड, कामगार चाळ, पांचाळ गल्ली, गांधी चौक, महात्मा फुले चौक, अहिल्यादेवी चौकात पुराचे शिरले आहे.

कामगार चाळीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. दरम्यान, नांदगाव तालुक्यात एकुण सरासरीपेक्षा जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने शेती व्यवसाय पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे नांदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. कारण या अतिवृष्टीमुळे शेतातील तूर, बाजरी, मका, कांदा, मुंग आदि पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -