घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रमक्रणपूर येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून परवाना रद्द करा

मक्रणपूर येथील स्वस्त धान्य दुकानाची चौकशी करून परवाना रद्द करा

Subscribe

गांभीर्याने दखल घेणे गरजेचे

कन्नड : शहरालगत असलेले मक्रणपूर येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५३ दुकान धारकाकडून मयत, निर्वासित, विस्थापित तसेच अंत्योदय कार्ड धारकाची धान्य व साखर काळ्या बाजारात विकतो म्हणून सदर बाबीची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीचे निवेदन सादिक कादर सैय्यद यांनी तालुका पुरवठा अधिकारी, तहसीलदार कन्नड तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले आहे.

मक्रणपूर गाव हे पाच हजार लोकसंख्येचे असून गावात दोन ते तीन स्वस्त धान्य रेशन दुकान असायला हवे मात्र सदरील स्वस्त दुकानदार विनायक सोनवणे हे गेल्या तीस वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या सत्तेत असल्याने एक ही नवीन स्वस्त धान्य दुकानाचा ठराव घेऊ दिला नाही. त्यामुळे गावात एकच स्वस्त धान्य रेशन दुकान असल्याने दुकानावर चांगलीच झुंबड उडत आहे व स्वस्त धान्य दुकानदार रेशन कोटा आल्यावर फक्त दोन दिवसांत वाटप केल्याने शिधाधारकास तासन्तास ताटळत बसावे लागते. यामुळे गावात स्वस्त धान्य दुकान परिसरात भांडणांचे प्रमाण ही वाढत आहे व जाती जातीत तेढ निर्माण होत आहे.

- Advertisement -

शासनाच्या नियमाप्रमाणे सकाळी व सायंकाळी स्वस्त धान्य रेशन दुकान सुरू असायला हवे परंतु असे होताना दिसत नाही. दक्षता समितीचे फलक नाही, भांडार स्टॉक माल फलक नाही, वाटप माल फलक नाही, शिल्लक मालाचे फलक नाही, कार्डधारकांची संख्या दर्शक फलक नाही सारे आलबेल दिसत आहे. स्वतःच्या मुलाचे नाव अंत्योदय योजनेत टाकून स्वस्त धान्य रेशन लाटून शासनाची फसवणुक करत आहेत. मयत, निर्वासित, विस्थापित नावावरचे किती क्विंटल धान्य हे काळ्या बाजारात विकले जाते? ही तर गावातील नागरिकांची व शासनाची फसवणूक सुरू आहे. याकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल. म्हणूनच गावातील सादिक कादर सैय्यद व इतर दहा नागकिांनी तालुका पुरवठा अधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी चौकशी करून योग्य ती कारवाईचे आदेश दिले आहेत. रेशन दुकानदारांच्या अरेरावी ट्रॉसिटीच्या धमक्या देणे रेशन दुकानदाराच्या जाचाला कंटाळुन सुमारे शंभर ते दोनशे कार्ड धारक दुसर्‍या रेशन दुकादारांकडून रेशन घेत आहे असेही या निवेदनात म्हटले आहे. या सर्व बाबीकडे पुरवठा विभागाने गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई करावी असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -