घरमहाराष्ट्रनाशिकदेवळा-उमराणे रस्त्याची खड्ड्यांनी लावली वाट

देवळा-उमराणे रस्त्याची खड्ड्यांनी लावली वाट

Subscribe

प्रशासन बघ्यांच्या भूमिकेत

देवळा : तालुक्यातील देवळा-उमराणे रस्त्याची (वघाई राज्य मार्ग) मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाट लागली आहे. यामुळे वाहने चालवताना कसरत करावी लागते. मध्यंतरी माती टाकून खड्डे बुजवले असले तरी त्यातील माती निघून गेल्याने रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे झाले आहेत.

या रस्त्यावरून सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणार्‍या भाविकांची सतत वर्दळ असते. तसेच मालेगाव, चाळीसगाव भागातील ऊस याच मार्गाने साखर कारखान्यांकडे येत असतो. परंतु खड्ड्यांमुळे वाहनांचे तर नुकसान होतच आहे, शिवाय अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा रस्ताही महामार्ग होण्याच्या वाटचालीत असला तरी तो केंव्हा होईल याची निश्चित खात्री नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालत रस्त्याची सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

सोमवार (दि. ५) रोजी चाळीसगावकडून येणारा उसाचा ट्रक (एमएच१८-बीए १२५) या रस्त्यावर उलटला. खड्ड्यांमध्ये आदळल्यामुळे मागील चाक अचानक निखळून पडल्याने हा ट्रक उलटला. सुदैवाने त्या बाजूला दुसरे कोणतेही वाहन वा पादचारी नसल्याने अनर्थ टळला. सदर ऊसाचा ट्रक वसाका कारखान्याकडे जात होता.

प्रमोद उगलेhttps://www.mymahanagar.com/author/pramodu/
3 वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय.डिजिटल, प्रिंट मीडियाचा अनुभव. मनोरंजन, लाईफस्टाईल विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -