घरमहाराष्ट्रनाशिक - उ. महाराष्ट्रकेंद्रीय मंत्रिमंडळात नाशिकला स्थान, खासदार डॉ. भारती पवार यांना मिळाली संधी

केंद्रीय मंत्रिमंडळात नाशिकला स्थान, खासदार डॉ. भारती पवार यांना मिळाली संधी

Subscribe

थोड्याच वेळात घेणार शपथ, दिंडोरी मतदारसंघात उत्साहाचे वातावरण

जिल्ह्यातील पहिल्या महिला खासदार डॉक्टर भारती पवार यांच्या रुपाने नाशिकला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले. या निवडीमुळे जिल्ह्यात विशेषतः दिंडोरी मतदार संघात उत्साहाचे वातावरण आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही मंत्र्यांचे राजीनामे घेऊन केंद्र सरकारने मंत्रिमंडळात नव्या ४३ मंत्र्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या मंत्रिमंडळात दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवारांना स्थान मिळणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. पवारांना तिकट नाकारल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर वर्षभरातच आदर्श संसद सदस्य पुरस्कारही त्यांनी पटकावला. एमबीबीएस असलेल्या डॉ. भारती पवार यांचा आदिवासी भागातील कुपोषणावर विशेष अभ्यास असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. उत्तर महाराष्ट्रातील खासदारांमध्ये त्यांचा समावेश झाल्याने मतदारसंघात उत्साहाचे वातावरण आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -