घरमहाराष्ट्रकरोनाविरुद्घ वॉडबॉयच्या नोकरी ११४ जागांसाठी दीड लाख अर्ज

करोनाविरुद्घ वॉडबॉयच्या नोकरी ११४ जागांसाठी दीड लाख अर्ज

Subscribe

महापालिका रुग्णालयातील ११४ वॉर्डबॉयच्या जागांसाठी दीड लाख अर्ज

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी कक्ष परिचर अर्थात वॉर्ड बॉयच्या ११४ जागांसाठी मागवलेल्या अर्जांची मुदत शुक्रवारी संपुष्ठात आली आहे. मात्र, या ११४ जागांसाठी मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये सुमारे दीड लाख उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे ही भरती केवळ करोना रुग्णांसाठीच असल्याचे सांगूनही या आजाराला भीती न बाळगता केवळ महापालिकेची नोकरी मिळेल या एकाच आशेने दीड लाख उमेदवारांनी आपले नशिब आजमवण्याचा प्रयत्न केला आहे.

मुंबई करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे केवळ करोनागस्तांची सेवा तसेच या संदर्भातील इतर कामकाज करण्यासाठी कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारितील विशेष रुग्णालयातील रिक्त असलेली कक्ष परिचर ही पदे अर्ज मागवून भरण्यासाठी ९ एप्रिल २०२० रोजी जाहिरात प्रसिध्द केली होती. यामध्ये उमेदवारांकडून १७ एप्रिल २०२०पूर्वी अर्ज पोस्टाने किंवा इमेल आयडीवर अथवा महापालिका मुख्यालयातील पेटीत जमा करण्याचे आवाहन केले ही भरती प्रक्रीया केवळ करोनाबाधित रुग्णांशी संबंधित असलेल्या कामकाजाशी करण्यात येत असल्याचे यामध्ये नमुद करण्यात आले होते.

- Advertisement -

त्यानुसार ई-मेलद्वारे तसेच पोस्टाने आणि महापालिका मुख्यालयाजवळ ठेवलेल्या पेटीत प्राप्त झालेल्या अर्जांचा आकडा दीड लाखांच्या आसपास आहे. शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या नोंदीनुसार १ लाख ४३ हजार ३३४ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. तर शेवटच्या दोन तासांमधील प्राप्त अर्जांची माहिती संकलित करण्याचे काम सुरु होते. परंतु ही संख्या दीड लाखाच्या आसपासच असण्याची शक्यता सामान्य प्रशासनाच्यावतीने वर्तवली जात आहे. त्यानुसार यासर्व अर्जांची पडताळणी तसेच छाननी करून या सर्वांची यादी तयार केली जाणार आहे. उमेदवारांना शिक्षणाची अट दहावी असली तरी यामध्ये पदवी शिक्षण तसेच त्यापेक्षा अधिक शिक्षण केलेल्या उमेदवारांनीही यासाठी आपले नशिब आजमवण्याचा प्रयत्न केला आहे.

यापूर्वी आले होते पावणे तीन लाख
मुंबई महापालिकेत यापूर्वी २००७-०८मध्ये कामगार, कक्ष परिचर, श्रमिक, हमाल आया व स्मशान कामगार आदी पदांसाठी १३८८कामगारांची भरती सरळ सेवेद्वारे भरण्याचा निर्णय घेऊन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात आले होते. या भरतीमध्ये तेव्हा एकूण २ लाख ८७ हजार ८८उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु यापैकी २ लाख ४० हजार ४९५ उमेदवार परीक्षेल बसले होते. पण यासर्व उमेदवारांमधून १ लाख ६ हजार १९३ उमेदवार हे उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे केवळ ११४ जागांसाठी सुमारे दीड लाख अर्ज प्राप्त होणे हे महापालिकेच्या इतिहासात मोठी घटना मानली जात आहे. यावरून अनेक शिकलेले तरुण कायमस्वरुपी नोकरीपासून किती वंचित असून प्रत्येकाला आता सुरक्षित नोकरी हवी,असल्याचे यावरून स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -