घरमहाराष्ट्रMonsoon Update: महाराष्ट्रातील 'या' भागात ऑरेंज अलर्ट, 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Monsoon Update: महाराष्ट्रातील ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट, 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Subscribe

मागील दोन दिवसांपासून (Monsoon Update) राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. 27 जून मंगळवारी रोजी म्हणजे उद्यासाठी राज्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील 24 तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मराठवाड्यात देखील सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरांत सलग दुसऱ्या दिवशीही पाऊस झाल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे. पाणी साचल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल या भागांमध्ये आज देखील हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

- Advertisement -

बंगालच्या उपसागरातील वाऱ्याच्या स्थितीमुळे मॉन्सूनच्या पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे, मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवर पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वसई, विरार आणि मीरा-भाईंदरमध्येही पावसाच्या सरी कोसळल्या. दक्षिण मुंबईतही रिमझिम पाऊस पडत आहे.

ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ

ठाणे शहरात पावसाचा चक्क रात्रीचा खेळ चालला आहे. मागील चोवीस तासांत 85.49 मिमी पावसाची नोंद झाली असून मध्यरात्री अवघ्या तीन तासांत 57.11 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे. अशाप्रकारे रात्री पाऊस झोडपत असताना सोमवारी सकाळीपासून पावसाचे बरसणे सुरूच होते. याचदरम्यान शहरात 9 ठिकाणी झाडे कोसळली असून 7 ठिकाणी झाडांच्या फांदया तुटून पाडल्या आहेत. या घटनांमुळे 5 वाहनांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

हेही वाचा :ठाण्यात पावसाचा रात्रीचा खेळ; मध्यरात्री तीन तासांत 57.11 मिमी बरसला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -