घरताज्या घडामोडीआमच्या झोपडीला खुणावल्याशिवाय राजमहल होऊ शकत नाही; महादेव जानकर यांचा नेमका कोणाला...

आमच्या झोपडीला खुणावल्याशिवाय राजमहल होऊ शकत नाही; महादेव जानकर यांचा नेमका कोणाला इशारा?

Subscribe

नाशिक : एका बाजूला मोदी साहेब यांचे डांबरीकरण आहे. दुसर्‍या बाजूला राहुल गांधी यांचे काँक्रिटीकरण आहे. मी मध्ये माझा छोटासा मार्ग काढत आहे. मी एनडीए मध्ये आहे. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीए मध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. बाहेरच्या राज्यात आम्ही एनडीए सोबत नाही. राष्ट्रवादी आणि ठाकरे गट यांच्यापेक्षा आम्हाला मतांची टक्केवारी जास्त आहे. त्यामुळे आमच्या झोपडीला खुणवल्याशिवाय राजमहाल होऊ शकत नाही, असा टोला रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लगावला.

रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे नाशिक दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, एका बाजूला मोदी साहेब यांचे डांबरीकरण आहे. दुसर्‍या बाजूला राहुल गांधी यांचे काँक्रिटीकरण आहे. मी मध्ये माझा छोटासा मार्ग काढत आहे. मी एनडीए मध्ये आहे. पण आम्हाला लोकसभेला जागा मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिंमतीवर पक्ष चालवतो. आम्ही म्हणतो एनडीए मध्ये आहे. पण ते जाहीरपणे म्हणत नाही. ज्यावेळी माझे 50 आमदार असतील, त्यावेळी मी बोलेल, असेही ते म्हणाले. तसेच मी इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असून प्रॅक्टिकल वागतो. ज्याच्यामागे मास आहे, त्याला सोडायचे आणि ज्याच्या मागे कुणीही नाही, त्याला घ्यायचे, असे भाजपचे धोरण आहे. त्यांना कपालेश्वर बुद्धी देवो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

- Advertisement -

आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू

भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष असून त्यांना सल्ला देण्याइतपत मोठा नाही. त्यांच्यावर आम्ही नाराज नाही, राग देखील नाही. मी स्वतःला सांगतो, की महादेव जानकर स्वतःला मोठा कर, म्हणजे त्यावेळी मीडिया देखील मागे येईल. आम्ही भाजपसोबत असून आम्हाला विधानसभेला, लोकसभेला जागा मिळाली नाही. आम्ही बंडखोरी करुन शेवटी आमचा आमदार निवडून आणला. त्यावेळी शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार सांगणार्‍या काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला सोबत घेतले नाही. आम्ही भाजपला म्हणणार नाही, आम्हाला काही द्या. त्यांनी आम्हाला जागा द्याव्या. आम्हाला मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रीपद द्यावे, आमचे हेलिकॉप्टर जर लँड झाले तर, आम्ही आमची जागा दाखवून देऊ असा इशारा देत त्यांना मित्रपक्षाची गरज आहे. मात्र त्यांनी मित्रपक्षाची वाट लावली असून त्यामुळे आमची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरु असल्याचे म्हणाले.

बीएसआरशी अद्याप चर्चा नाही

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएस पक्षाकडून ऑफर आल्याच्या चर्चा आहेत. यावर ते म्हणाले की, पंकजाताई माझी बहीण आहे. त्या एका पक्षाच्या सचिव असून हुशार आहेत. याबाबत त्या स्वतः योग्य तो निर्णय घेतील. मी सल्ला देण्याइतपत मोठा नाही, असे ते म्हणाले. तसेच बीआरएस पक्षाबाबत ते म्हणाले की, कुठल्याही पक्षाला लोकशाहीत अधिकार असून जनता ही जनार्दन आहे. जनता ठरवेल, बीआरएस पक्षाचे शेतकरी धोरण चांगले आहे. माझ्याशी अजून काही त्यांनी चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -