घरमहाराष्ट्रपाडवा स्पेशल : या शुभ मुहूर्तावर उभारा गुढी

पाडवा स्पेशल : या शुभ मुहूर्तावर उभारा गुढी

Subscribe

एप्रिल महिना आला की, गुढीपाडवा या सणाची मोठी उत्सुक्ता सगळ्यांनाच असते. उद्या दि. ६ रोजी गुढी या मुहूर्तावर उभारणी करा.

एप्रिल महिना आला की, गुढीपाडवा या सणाची मोठी उत्सुकता सगळ्यांनाच असते. गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून हा वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला महाराष्ट्रात साजरा केला जातो. तसेच साडेतीन मुहूर्तापैकी गुढीपाडवा एक मुहूर्त मानला जातो. गुढीपाडव्या दिवशी महाराष्ट्रातील नागरिक घराच्या प्रवेशव्दारी उंचावर गुढी उभी केली जाते. तसेच वेगवेगळ्या भागांमध्ये, चाळींमध्ये, शोभायात्राकाढून, देखावे उभे करून हा सण साजरा करतात. या सणाला प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये विजयदिन म्हणून उगारी आणि संवत्सर पाडवो अश्या नावानी तर वेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो.

गुढी उभारण्याचा मुहूर्त

पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले की, उद्यापासून शालिवाहन शके १९४२, विकारीनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. उद्या दि. ६ रोजी सकाळी सूर्योदयापासून दुपारी १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत गुढी उभारून नवीन वर्षाचा संकल्प करावा. तसेच या नूतन संवत्सरामध्ये एकूण चार ग्रह असणार आहेत, असेही सोमण यांनी सांगितले. या नूतन संवत्सरामध्ये श्रावण, भाद्रपद आणि आश्विन हे महिने वगळता बाकी नऊ महिन्यात विवाहाचे योग आहेत.

- Advertisement -

वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो

महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये गुडीपाडवा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा केला जातो. दक्षिण भारतात, बिहार, ओडिसा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तरखंड, हिमाचल प्रदेश, हरयाणामध्ये सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तो दिवस नववर्ष दिन म्हणून साजरा करतात. तसेच गुजरातमध्ये कार्तिक शुक्ल प्रतिपदा दिवाळी पाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा केला जातो.

गुढीची सजावट

गुढीपाडव्या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे किंवा तांब्या ठेवले जाते. तसेच गुढीला सजवल्यानंतर गुढी पाटावर उभी केली जाते. तर गुढी ही स्वागताचे
प्रतिकही मानले जाते.

- Advertisement -

कडुलिंबाचे पान खातात

या दिवशी घरातमध्ये कडुलिंबाची पाने खायला लावतात. कडुलिंबाचे पान खाण्या मागील शास्त्रीय कारण म्हणजे, कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारणे, पित्त नाश करणे, त्वचा रोग बरे करणे, धान्यांतली कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. गुढी पाडव्यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -