घरमहाराष्ट्रनाशिककुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास ‘बिटको’त नकार

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यास ‘बिटको’त नकार

Subscribe

नाशिकरोड बिटको हॉस्पिटल एका महिलेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी बिटको हॉस्पिटल येथे आली असता तिला चक्क डॉक्टरांनी नकार दिल्याची गोष्ट उघडकीस आली आहे.

नाशिकरोड बिटको हॉस्पिटल एका महिलेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी बिटको हॉस्पिटल येथे आली असता तिला चक्क डॉक्टरांनी नकार दिल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. यामुळे बिटको हॉस्पिटलची विश्वासर्हता नष्ट होत चालली असल्याची प्रतिक्रिया रुग्णांनी दिली आहे.

रोहिणी नरेंद्रसिंग पाटील या महिलेने १६ मार्चला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासंबंधी उपचार सुरू केले. मात्र, त्या गरोदर असल्याकारणामुळे त्यांना विविध चाचण्या करण्यासाठी पंधरा दिवसाचा वेळ लावून त्यांचा गर्भपात करून कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासंबंधी डॉक्टरांनी नकार दिला. यामध्ये जवळपास वीस ते बावीस दिवसाचा कालावधी गेला. काल (दि.४) रोहिणी नरेंद्रसिंग पाटील आणि त्यांच्या नातेवाईकांनी बिटको रुग्णालयात गोंधळ घातला. सामाजिक कार्यकर्ते राजू लवटे यांनी रुग्णालयातील अधीक्षक डॉ नितीन रावते यांना महिलेच्या शस्त्रक्रियेसंबंधी जाब विचारला.

- Advertisement -

डॉक्टरांनी महिला हाय रिस्क झोनमध्ये असल्याने शस्त्रक्रिया करू शकत नसल्याचे कारण दिले. यासंबंधी लवटे यांनी डॉक्टरांकडून लेखी खुलासा मागवला आहे. इथल्या डॉक्टर कर्मचार्‍यांच्या अरेरावीला कंटाळून नागरिक या रुग्णालयाची पायरी चढणे नापसंत करत आहे, सध्या बिटको हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणीच्या सुविधा कमी प्रमाणात आहे. श्वानदंशाची लसही सध्या उपलब्ध नसून बिटको हॉस्पिटलचे रुग्ण सध्या सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेण्यासाठी जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -