घरमहाराष्ट्रराहूलजी नाही फक्त 'राहूल' म्हणा

राहूलजी नाही फक्त ‘राहूल’ म्हणा

Subscribe

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचा आज महाराष्ट्रात दौरा असून याची सुरुवात त्यांनी पुण्यातील एका कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून केली. पुण्यातील हडपसर येथे राहूल गांधी यांनी तरुणांशी संवाद साधला.

युवकांचा नेता, तरुणाईला प्रोत्साहन देणारा, त्यांना प्रश्नांना सामोरं जाणार राजकारणी म्हणून काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची वेगळी ओळख आहे. पुन्हा एकदा राहूल गांधी यांनी विद्यार्थ्यांसी मनमोकळा संवाद साधला आहे. पुण्यातील हडपसर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राहूल गांधी यांनी पुन्हा एकदा स्वःताचा एकेरी उल्लेख मी तुमच्यातलाच आहे, असे दाखला दिला. पुण्यातील या विशेष कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी केले असून यावेळी सुबोध पुकारलेल्या राहूलजी नंतर त्यांना फक्त राहूल म्हणा, असे राहूल गांधी यांनी सांगितले. यावेळी राहूल यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरदेखील दिली.

- Advertisement -

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं 

राहुल गांधी यांनी पुण्यात असून हडपसरच्या मगरपट्टा सिटी येथे तरुणांशी संवाद साधला. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. सुबोध भावे यांनी जेव्हा संवाद साधण्यास खूप हिंमत लागते, असं विचारलं असता राहुल गांधींनी सांगितलं की, ‘अनुभवातून हिंमत आली. जे सत्य आहे ते स्विकारलं. सत्यातून हिंमत येते. जर खोटं स्विकारलं तर भीती निर्माण होते. सत्य कधी कडवं असतं पण ते स्विकारावं लागतं’. पुढे बोलताना जर एखादी गोष्ट करण्याचा निर्णय मी घेतला तर त्याचे काही परिणाम असले तरी मी ते पूर्ण करतो, असं सांगितलं. तसेच राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे, असं मत राहूल गांधींनी व्यक्त केलं.

माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम

रोजगाराच्या प्रश्नावर बोलताना भारत रोज २४ हजार नोकऱ्या गमावत आहे, आपल्या देशात कौशल्याचा आदर केला जात नाही अशी खंत राहुल गांधींनी व्यक्त केली. ‘तुम्ही ७२ हजार रुपये कसे उभारणार विचारलं असता तुम्ही नीरव मोदी, विजय मल्ल्या यांच्याबद्दल ऐकलं आहे का अशी राहुल गांधींची विचारणा केली. ७२ हजार रुपये देण्यासाठी आयकर वाढवला जाणार नाही याची हमी मी देतो, सर्वसामान्यांना कोणताही फटका बसणार नाही असंही ते म्हणाले. माझं नरेंद्र मोदींवर प्रचंड प्रेम आहे, माझा त्यांच्यावर अजिबात राग नाही, पण त्यांचा माझ्यावर राग आहे, असं राहुल गांधींनी म्हणताच हॉलमध्ये नरेंद्र मोदींच्या नावे घोषणाबाजी करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -