घरक्रीडामैदानात घुसणे कोहलीच्या चाहत्याला पडले महागात

मैदानात घुसणे कोहलीच्या चाहत्याला पडले महागात

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात मैदानात घुसणाऱ्या मोहम्मद खान या चाहत्यावर पोलिसांनी केस केली आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामना सुरू असताना अचानक मैदानात घुसून भारताचा कर्णधार विराट कोहलीला मिठी मारून त्याच्यासोबत फोटो काढणाऱ्या चाहत्यावर पोलिसांनी केस केली आहे. आंध्र प्रदेशच्या कडापाचा रहिवासी असणाऱ्या मोहम्मद खान हा व्यक्ती सामना सुरू असताना मैदानात घुसला. त्याच्यावर सुरक्षेचे नियम तोडल्यामुळे केस करण्यात आली आहे.

सुरक्षेचे नियम मोडल्यामुळे केस

पोलीस इन्स्पेक्टर पी. वेंकटेश्वरलू यांनी या चाहत्यावर सुरक्षेचे नियम मोडल्यामुळे केस दाखल केली आहे. १५ षटके पूर्ण झाल्यानंतर एक तास झाल्यामुळे ड्रिंक्स ब्रेक सुरू असताना हा चाहता कोहलीकडे धावत गेला. त्याने कोहलीला जोरदार मिठी मारली आणि त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, कोहलीला ते फारसे आवडलेले दिसले नाही. कोहली त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -