घरमहाराष्ट्रपंकजा मुंडे 21 जूनला कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, घेणार 'त्या' कार्यकर्त्याची भेट

पंकजा मुंडे 21 जूनला कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, घेणार ‘त्या’ कार्यकर्त्याची भेट

Subscribe

विधानपरिषदेची निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीत भाजपकडून पंकजा मुंडेंना डावलण्यात आले आहे. यानंतर उमेदवारी न मिळाल्याने पंकजा मुंडेंचे समर्थक नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर पकंजा मुंडे 21 जूनला पाथर्डीतील मोहटा देवीचे दर्शन घेणार हेत. यावेळी त्या पाथर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

घेणार त्या कार्यकर्त्याची भेट –

- Advertisement -

पंकाजा मुंडे 21 नूनला मोहटा देवीचे दर्शन घेणार असून पार्थर्डीतील भाजप कार्यकर्त्यांशी संवाध साधणार आहेत. यावेळ त्या मुकुंद गर्जे या कार्यकर्त्याचीही घेणार भेट घेणार आहेत. मुंडेंना भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर मुकुंद गर्जेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पंकजा मुंडे त्या कार्यकर्त्याची भेट घेणार आहेत.

पंकजा मुंडेंच्या स्वागताची जोरदार तयारी –

- Advertisement -

21 जूनच्या पंकजा मुंडे यांच्या स्वागताची कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ‘चलो मोहटादेवी’ असे बॅनर सोशल मीडियावर झळकताना दिसत आहेत. भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावलल्याची कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त केली जात आहे. आता त्यावर पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -