घरट्रेंडिंगपावसाने दडी मारल्याने मुंबईकरांवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता

पावसाने दडी मारल्याने मुंबईकरांवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता

Subscribe

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने पाणी संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही.

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. यंदा पावसाने दडी (Mumbai Rain) मारल्याने पाणी (Water) संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा (Mumbai Water Supply) करणाऱ्या धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ११ टक्के पाणीसाठी उपलब्ध असल्याचे समजते. (due to prolonged rain water shortage crisis in mumbai)

पाणी कपातीचे संकट

- Advertisement -

मुंबईत जुलै अखेर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी कपातीचे संकट ऐन पावसाळ्यात ओढवणार आहे. जून महिन्याच्या शेवटी मुंबई महापालिका (BMC) पाण्याच्या साठ्याबाबत आढावा घेऊन याबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहे.

हेही वाचा – पुढील पाच दिवसांत मान्सूनचा जोर आणखी वाढणार; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता

- Advertisement -

धरण क्षेत्रात एकूण जलसाठा 160831 दशलक्ष लिटर

मिळालेल्या माहितीनुसार, धरण क्षेत्रात (Dam Area) एकूण जलसाठा 160831 दशलक्ष लिटर शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी जलसाठा 186719 दशलक्ष लीटर होता. त्यामुळे यावर्षी पाणीसाठी कमी झाल्याने पाणी जपून वापरावे लागणार आहे. पाऊस असाच लांबला तर पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईला सात धरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • मोडक सागर 48357
  • तानसा 6088
  • मध्य वैतरणा 23719
  • भातसा 76788
  • विहार 3715
  • तुलसी 2164

मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईसह (Mumbai) राज्याच्या अनेक भागांत पावसाने (Heavy Rainfall) हजेरी लावली आहे. काही परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मागील काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अशातच येत्या पाच दिवसांत मुंबई आणि ठाणे (Thane) शहरांत पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.


हेही वाचा – अमित ठाकरेंकडून विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी; प्रत्येक महाविद्यालयात ‘मनविसे’चे युनिट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -