घरमहाराष्ट्रभविष्यातील राजकीय कारकीर्दीबाबत पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या...

भविष्यातील राजकीय कारकीर्दीबाबत पंकजा मुंडेंचे मोठे वक्तव्य, म्हणाल्या…

Subscribe

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भविष्यातील राजकीय कारकीर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या राजकारणापासून बऱ्याच लांब होत चालल्याचे पाहायला मिळत आहे. दोन महिने त्यांनी तर राजकारणापासून लांब राहात विश्रांती घेतली होती. पण सप्टेंबर महिन्यात पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांनी काही जिल्ह्यांचे दौरे करत शिवशक्ती यात्रा काढली. यावेळी त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी भरभरून प्रेम दिले. पंकजा मुंडे या नेहमीच प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या भविष्यातील राजकारणाविषयी भाष्य करत असतात. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या भविष्यातील राजकीय कारकीर्दीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत. माझ्या वैयक्तिक राजकारणापुरते मी सांगते. पुढच्या भविष्यात काय होणार आहे. राजकारणात पुढचे निर्णय काय होणार आहेत याकडे सगळे लक्ष ठेवून आहेत तसे मी देखील लक्ष ठेवून आहे, असे या मुलाखतीत पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. (Pankaja Munde’s big statement about her future political career)

हेही वाचा – “नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…” विधानसभा अध्यक्षांवर संजय राऊतांचा हल्लाबोल

- Advertisement -

यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझी भूमिका आहे ती राज्यात नाही, तर राज्याच्या बाहेर आहे. एखादा व्यक्ती केंद्रात काम करतो, उदाहरण द्यायचे झाले तर एका वृक्षाचे टोक केंद्रात असले तरी त्याची मूळं राज्यात असतात. ती मूळे तो उखडून नेत नसतो. म्हणजे प्रमोद महाजन पूर्णवेळ राष्ट्रीय राजकारणात शिफ्ट झाले. तसे गोपीनाथ मुंडे करू शकले नाहीत. कारण त्यांचा मतदारसंघ आहे, ग्राऊंड पातळीवर समर्थक आहेत. त्यामुळे इथे मूळे आहेत. त्यामुळे या मूळांना मी काय देऊ शकते हेच माझे राजकारणातील ध्येय असणार आहे. भविष्यात माझे राजकारण काय असेल यावर माझ्यासह अनेकांना प्रश्न पडला आहे. कारण आता नवीन मित्र आम्हाला जोडला गेला आहे. तिकीट वाटपाचे कसे असेल. तेव्हा पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील? त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत, असे स्पष्ट मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे.

तर, त्याचसोबत मी या परिस्थितीतून कसे बाहेर पडेन, हे सांगू शकत नाही. परंतु मी बाहेर पडेन. मी जेवढे वर्ष राजकारणात आहे त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न आहे. स्वत:ची कोंडी कोणी करत नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे. केवळ माझीच नाही तर अनेकांची आहे. कोणी समोर येऊन बोलत नाही. मला अभूतपूर्व आणि अद्वितीय असा अनुभव आला आहे. लोकांचा प्रतिसाद माझ्यासाठी आत्मविश्वास वाढवणारा आणि सकारात्मक बळ देणारा आहे. मी वाट पाहतेय, आज राजकीय पटलावर माझ्याकडे जी शक्ती आहे ती लोकांची ताकद आहे, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या जागी त्या खासदारकीची निवडणूक लढवणार की नाही, याबाबतही प्रतिक्रिया दिली. 10 वर्ष खासदार असलेल्या, रोज झटणाऱ्या प्रीतम मुंडे यांना विस्थापित करून स्वत:चे प्रस्थ तिथे बसवणे हे मी करणार नाही. प्रीतम मुंडे जे काम करू शकतात, ते त्याच करू शकतात. खासदार म्हणून त्यांनी पदाला न्याय दिला आहे. मतदारसंघातील लोकांशी संपर्क आहे. बाबा असल्यापासून मी राज्याकडे लक्ष देत आहे. प्रीतम मुंडे हे त्या मतदारसंघात मर्यादित आहे. त्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा आहे. त्यामुळे प्रीतम मुंडे यांचे काम आपण पुसावे याला अंहकार म्हणतात जो माझ्यात नाही, असे सांगत पंकजा यांनी लोकसभेची निवडणूक न लढविण्याबाबत स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -