घरमहाराष्ट्रगृहमंत्र्यांच्या आक्षेपानंतर परमबीर सिंह यांनी सोडली सरकारी गाडी

गृहमंत्र्यांच्या आक्षेपानंतर परमबीर सिंह यांनी सोडली सरकारी गाडी

Subscribe

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगासमोर चौकशीला जाण्यापूर्वी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. मात्र परमबीर सिंह आणि सचिन वाझेच्या भेटीची मुंबई पोलिस आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत.

तसेच परमबीर सिंह यांनी चौकशीला जाताना सरकारी गाडीचा वापर करण्यावर गृहमंत्र्यांनी आक्षेप नोंदवला आहे. गृहमंत्र्यांच्या आक्षेपानंतर आत्ता परमबीर सिंह आणि त्यांच्या वकिलांनी गाडी बदलली आहे. परमबीर सिंह यांना कोपरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात सीआयडीने समन्स बजावून चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

या चौकशीला जाताना परमबीर सिंह हे आपल्या ऑफिशियल गाडीत न बसता एक इनोव्हा गाडीत बसले होते. यानंतर सिंह यांची गाडी पी डीमेलो रोडने निघाली आहे. त्यामुळे परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांच्या आक्षेपानंतर सरकारी गाडीचा वापर करणे सोडले असल्याचे बोलले जात आहे.

परमबीर सिंह यांनी सरकारी गाडी वापरणे चुकीचे – गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील

दरम्यान आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर आणि सरकारी गाडी वापरण्यावर आक्षेप नोंदवला आहे. यावर बोलताना गृहमंत्री म्हणाले की, “परमबीर सिंहांच्या निलंबनावर कायदेशीर प्रक्रिया सुरु असून लवकरंच यासंदर्भातील अंतिम निर्णय घेऊ. त्यांनी आत्तापर्यंत कोणताच पदभार स्वीकारला नाही, तसेच राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही माहिती दिली नाही. परमबीर सिंह यांना कोर्टाने समन्स बजावला असताना आणि ड्युटीवर नसतानाही त्यांनी सरकारी गाडी, गर्व्हमेंट मस्टरिचा वापरणे करणं चुकीचे होते. परमबीर सिंह यांनी होमगार्ड ऑफिसमध्ये गेले असले तरी त्यांनी महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारलेला नाही ते बाहेरच्या वेटिंग रुममध्ये बसले होते.”

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -