घरक्रीडाR Ashwin : 'मला वाटले आता करियर संपणार...; IPL ने बदलले नशीब,...

R Ashwin : ‘मला वाटले आता करियर संपणार…; IPL ने बदलले नशीब, अश्विनची भावूक प्रतिक्रिया

Subscribe

कानपूर मधील पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरल्यानंतर अश्विनने त्याच्या करियर बद्दल मोठे वक्तव्य केले आहे

भारताचा स्टार फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने भारत आणि न्यूझीलंडमधील पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. तो भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत तिसरा गोलंदाज ठरला आहे. कानपूर मधील पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरल्यानंतर अश्विनने त्याच्या करियर बद्दल मोठे वक्तव्य केले आहे. त्याने सांगितले की, त्याला भीती होती की मागील वर्षी कोरोनाच्या महासाथीच्या कारणास्तव त्याची क्रिकेटमधील कारकिर्द संपुष्टात येईल. ३५ वर्षीय अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये ८० व्या सामन्यांत ४१९ बळी घेऊन १०३ सामन्यांत ४१७ बळी घेणाऱ्या हरभजन सिंगला मागे टाकले आहे.

अश्विनने सांगितले मागील वर्षाच्या सुरूवातीला भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यानंतर त्याचे करियर संपण्याच्या मार्गावर होते. बीसीसीआयच्या वेबसाइटसाठी त्याच्या साथीदार खेळाडू श्रेयस अय्यरला दिलेल्या मुलाखतीत त्याने म्हंटले की, “प्रामाणिकपणाने सांगितले तर कोरोना आणि टाळेबंदीमध्ये माझ्या जीवनात आणि करियर बाबत मागच्या काही वर्षांपासून जे काही होत होते, मला माहित नव्हते की मी कसोटी सामन्यांत परत खेळेन की नाही”.

- Advertisement -

अश्विनने सांगितले, “२९ फेब्रुवारी २०२० रोजी सुरू झालेली क्राइस्टचर्चमधील शेवटची कसोटी मी खेळलो नाही. मी पुन्हा कसोटी खेळू शकेन की नाही या प्रश्नावर मी चिंतेत होतो. माझे भविष्य काय आहे. मला कसोटी क्रिकेटमध्ये जागा मिळणार की नाही कारण मी त्याच फॉरमॅटमध्ये खेळत होतो. ईश्वर दयाळू आहे आणि आता सगळी परिस्थिती बदलली आहे”. असे अश्विनने म्हंटले.

- Advertisement -

मी दिल्ली कॅपिटल्स संघात आलो तेव्हा संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर होता तेव्हापासूनच परिस्थिती बदलली आहे. असे अश्विनने आणखी सांगितले. अश्विनचा संपूर्ण परिवार मे मध्ये कोरोनाने संक्रमित झाला होता. त्यामुळे त्याला आयपीएलच्या २०२१ च्या पहिल्या सत्रातून माघार घ्यावी लागली होती.


हे ही वाचा: http://IPL 2022 Auction : कोहली, धोनीपासून रोहित पर्यंत…; या खेळाडूंची रिटेनसाठी नावं झाली पक्की


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -