घरदेश-विदेशपतंजलीने लाँच केले करोनावर औषध

पतंजलीने लाँच केले करोनावर औषध

Subscribe

आयुष मंत्रालयाने घेतला आक्षेप

देशात आणि जगभरात करोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत योगगुरू बाबा रामदेव यांची आयुर्वेदिक कंपनी पतंजलीने करोनावर ‘कोरोनिल’ नावाच्या औषधाची घोषणा केली. मात्र आयुष मंत्रालयाकडून या औषधाची योग्य तपासणी अद्याप झालेली नाही. ती होईपर्यंत औषधाची जाहिरात करू नये, असे सांगितले आहे.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने करोनावरील आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ मंगळवारी लाँच केले. करोनावर मात करण्यासाठी हे आयुर्वेदिक औषध प्रभावी आहे, असा दावा बाबा रामदेव यांनी केला. मात्र आता पतंजली कंपनीने योग्य तपासणी होईपर्यंत कोरोनिल औषधाची जाहिरात न करण्याचे आदेश आयुष मंत्रालयाने दिले आहे.

- Advertisement -

आयुष मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे की, पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने करोनावरील उपचारासाठी विकसित केलेल्या कोरोनिल औषधाची आम्ही दखल घेतली आहे. पतंजली कंपनीने या औषधाची योग्य ती माहिती द्यावी. तसेच कोरोनिल औषधाची योग्य ती तपासणी होईपर्यंत या औषधामुळे करोना आजार बरा होतो, अशा आशयाची जाहिरात करू नयेत, असे आदेश आयुष मंत्रालयाकडून पतंजलीला देण्यात आले आहेत.

संपूर्ण सायंटिफिक डॉक्युमेंटच्या आधारे श्वासारी वटी, कोरोनिल ही करोनावरील एविडेंस बेस असलेले पहिले आयुर्वेदिक औषध आहे, असे रामदेव बाबा यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, हा रिसर्च संयुक्तपणे पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूट (पीआरआय) हरिद्वार, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (NIMS) जयपूरने केला आहे. या औषधाची निर्मिती दिव्य फार्मसी, हरिद्वार आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड, हरिद्वारकडून केली जात आहे.

- Advertisement -

योगगुरु बाबा रामदेव आणि पतंजलीचे सीईओ बालकृष्ण यांनी या औषधाच्या क्लिनिकल ट्रायलचे निकाल समोर आणले. बालकृष्णांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी लोकांनी योगही केला पाहिजे आणि योग्य आहार घ्यावा. कोरोनिलमध्ये गुळवेल, अश्वगंधा, तुळशी, श्वासारी रस आणि अणु तेलाचे मिश्रण आहे. त्यांच्या मते, हे औषध दिवसातून दोनदा – सकाळी आणि संध्याकाळी घेतले जाऊ शकते, असे बाळकृष्ण यांनी सांगितले. पतंजलीच्या मते, या औषधाचा शेकडो रूग्णांवर सकारात्मक क्लिनिकल चाचणी केली आहे. ज्याचा निकाल 100 टक्के आहे. कोरोनिल करोना रुग्णांना ५ ते १४ दिवसांत बरे करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -