घरमहाराष्ट्रबारसूमध्ये कोल्हापुरातून लोक आणली, उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा

बारसूमध्ये कोल्हापुरातून लोक आणली, उद्योगमंत्री उदय सामंतांचा दावा

Subscribe

बारसू गावात सुरु असलेल्या आंदोलनात कोल्हापूरातील लोक उपस्थित असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आला आहे. तर या आंदोलनाच्या नावाखाली राजकारण होत असल्याचा आरोप सामंत यांच्याकडून करण्यात आला आहे.

रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात असलेल्या बारसू गावात रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) होऊ नये, यासाठी या गावातील लोकांकडून काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. हे आंदोलन आता चिघळले असून ज्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यात येणार होते, त्याठिकाणी गावातील लोक गेल्याने त्यांना अडवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. तर अश्रुधूराच्या नळकांड्या देखील फोडण्यात आल्या. पण या आंदोलनात कोल्हापूरातील लोक उपस्थित असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) यांच्याकडून करण्यात आला आहे. तर या आंदोलनाच्या नावाखाली राजकारण होत असल्याचा आरोप सामंत यांच्याकडून करण्यात आला आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हंटले की, “आजही शेतकऱ्यांना आमचे सांगणे आहे की, कोणत्याही राजकीय दबावाला तुम्ही बळी पडू नका. तुमच्या ज्या काही शंका असतील त्या दूर करायला शासन तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात आमच्याशी चर्चा केली आहे. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. पण या ठिकाणी कोल्हापुरातीलही लोक उपस्थित आहेत, असे राजकारण होऊ नये असे मला वाटते.”

- Advertisement -

हेही वाचा – रिफायनरीसाठी सरकार दडपशाही करणार नाही; बरसू वासियांना मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन

“काल अनेक मध्यस्थांचे मला फोन आले, मी चर्चेसाठी तयार आहे. पण सर्वांनी समन्वयाने घेतलं पाहिजे. कारण प्रकल्प अजून येणार की नाही ठरवायचं आहे. अजून तिथे प्रकल्प आला नाही पण या आधीच लोकांची माथी भडकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच आज जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, त्या परिस्थितीला विनायक राऊत जबाबदार आहेत. कारण ते येऊन गेल्यानंतरच ही परिस्थिती निर्माण झाली,” असेही उदय सामंत यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

महत्त्वाची बाब म्हणजे नाणार गावात रिफायनरी प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर या प्रकल्पासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून बारसू गावातील पर्यायी जागा सुचविण्यात आली होती. पण जर का या गावातील लोकांचा या प्रकल्पाला विरोध असेल तर आमचाही विरोधच असेल, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच, बारसूच्या संदर्भात स्थानिक लोकांशी चर्चा करुन, त्यांना विश्वासात घ्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आले आहे, अशी माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -