घरताज्या घडामोडीऐकावं ते नवलचं! बारावीत कमी टक्के मिळाल्याने घरमालकानं भाडेकरूला नाकारलं

ऐकावं ते नवलचं! बारावीत कमी टक्के मिळाल्याने घरमालकानं भाडेकरूला नाकारलं

Subscribe

बंगळुरूतील मेट्रो शहरांमध्ये मागणी जास्त असल्याने भाड्याने घर मिळणं कठीण आहे. बंगळुरू हे आयटी हब आणि स्टार्टअप्ससाठी ओळखले जाणारे शहर, अधिक भाडं आणि घरमालकांच्या अवास्तव मागण्यांसाठी कुप्रसिद्ध आहे. परंतु एका व्यक्तीला बारावीत कमी गुण मिळाल्याने घरमालकाने भाडेकरूला घर नाकारल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे.

कामानिमित्त बंगळुरुमध्ये शिफ्ट होणाऱ्या तरुणांना या समस्या नेहमीच जाणवतात. यातच ही अविश्वसनीय घटना उघडकीस आली. एका शुभ नामक व्यक्तीने त्याच्या भावासोबत घडलेला प्रसंग ट्विटरवर शेअर केला आहे. घर भाड्यावर उपलब्ध करुन देणारा ब्रोकर आणि चुलत भावामधील संभाषण त्याने ट्विटरवर शेअर केलं आहे.

- Advertisement -

या व्यक्तीने त्याच्या चुलत भावाने ब्रोकरसोबत केलेल्या WhatsApp संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. ट्विटर वापरकर्ता शुभ (@kadaipaneeeer) याने शेअर केले की, एका ब्रोकरने त्याचा चुलत भाऊ योगेशला त्याचे LinkedIn, Twitter प्रोफाइल, तो ज्या कंपनीत नोकरीला होता त्याचे जॉइनिंग लेटर आणि त्याची इयत्ता 10वी आणि 12वीची मार्कशीट, आधार आणि पॅन कार्ड शेअर करण्यास सांगितले. तसेच त्याला स्वत:बद्दल 200 शब्दांचा लेख लिहायलाही सांगितले. त्यानंतर ब्रोकरने त्याला कळवले की, घरमालकाने त्याच्या बारावीच्या गुणांमुळे त्याला नाकारले आहे. ब्रोकरने सांगितले की, घरमालकाला 12वी मध्ये 90 टक्के अपेक्षित होते. मात्र या भाडेकरूला बारावीत 75 टक्के गुण मिळाले होते. त्यामुळे त्याने घर भाडेकरूनला नाकारलं.

- Advertisement -

‘गुण तुमचे भविष्य ठरवत नाहीत, परंतु तुम्हाला बंगळुरूमध्ये फ्लॅट मिळेल की, नाही हे निश्चितपणे ठरवते, असं कॅप्शन शुभने या पोस्टला दिलं आहे. हा घरमालक आयआयएममधून निवृत्त प्राध्यापक आहे, असं कमेंट शुभने शेअर केल्यानंतर शुभच्या या पोस्टवर युझर्सकडून भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. यामध्ये अनेकांनी स्व:ताचे अनुभव सांगितले आहेत.


हेही वाचा : अतिक-अशरफची गाडी रुग्णालयात न नेता… सुप्रीम कोर्टाकडून मुद्दा उपस्थित


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -