Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र 'ईडी'ची कामगिरी, 6 वर्षांत केली 1 लाख 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त

‘ईडी’ची कामगिरी, 6 वर्षांत केली 1 लाख 15 हजार कोटींची मालमत्ता जप्त

Subscribe

मागील 6 वर्षांत ईडीकडून विविध प्रकरणांमध्ये तब्बल 1 लाख 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : ईडी म्हणजेच सक्तवसुली संचालनालयाचे नाव जरी घेतले तरी अनेकांचे धाबे दणाणतात. विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा ठपकाच लावलेला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ईडीच्या कारवायांमध्ये झालेली वाढ ही सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांच्या विरोधाच रचण्यात आलेले कटकारस्थान असल्याचे वारंवार बोलले जाते. पण या ईडीने गेल्या 6 वर्षांमध्ये तब्बल कोटींच्या घरातील मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. मागील 6 वर्षांत ईडीकडून विविध प्रकरणांमध्ये तब्बल 1 लाख 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर एकूण 5 हजार 95 ईसीआयआर म्हणजेच प्राथमिक गुन्ह्यांची देखील नोंद करण्यात आलेली आहे. तसेच, देशभरामधून ईडीने आत्तापर्यंत विविध गुन्ह्यांमध्ये 531 लोकांना अटक केली आहे. (Performance of ‘ED’, assets worth 1 lakh 15 thousand crores seized in 6 years)

हेही वाचा – सोशल मीडियामुळे तुटतायत जवळची नाती; क्षुल्लक कारणांवरून वाद विकोपाला

- Advertisement -

महत्त्वाची बाब ईडीची सर्वाधिक धास्ती ही विरोधातील नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार 176 राजकीय नेत्यांविरोधात ईडीकडून आत्तापर्यंत गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील छगन भुजबळ, संजय राऊत, अनिल परब, नवाब मलिक, अनिल देशमुख तसेच राज्यातील अन्य महत्त्वांच्या नेत्यांचा समावेश आहे. त्यामुळे आता ईडीची सर्वाधित भीती असलेल्या विरोधकांवर अद्यापही टांगती तलवार आहे. तर ईडीचे लक्ष आजही देशातील अनेक आमदार, खासदार व माजी आमदार-खासदार, नेते यांच्यावर आहे.

ईडीकडून समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हजारांच्यावर असे अनेक जण आहेत, ज्यांच्यावर ईडीकडून गुन्ह्यांची नोंद करण्याक आलेली आहे. यामध्ये 25 प्रकरणांवर कोर्टातील सुनावणी पूर्ण झालेली आहे. तर 24 प्रकरणे अशी आहेत, ज्यांच्याबाबत कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नाहीत. ईडीकडून सर्वाधिक कारवाई ही मनी लाँड्रिंगच्या प्रकरणांमध्ये करण्यात येते. त्यामुळे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मनी लाँड्रिंगचे 45 प्रकरणे सिद्ध झालेली आहेत.

- Advertisement -

ईडीकडून जप्त करण्यात येणाऱ्या मालमत्तांच्या कारवाईमध्ये पहिल्यांदा तात्पुरती जप्ती करण्यात येते. त्यानंतर पक्की जप्ती करण्यात येते. महत्त्वाची बाब म्हणजे ईडीचे अधिकारी जेव्हा कारवाई करतात. त्यावेळी जर गुन्हा करून मिळवलेल्या पैशांतून मालमत्ता खरेदी केली गेली असेल तर त्याची जप्ती होते. सुरुवातीला ही जप्ती तात्पुरती असते, पण ज्यावेळी गुन्हा सिद्ध होतो, त्याची पडताळणी होते, त्यानंतर त्या मालमत्तांची पक्की जप्ती केली जाते.

- Advertisment -