घरमहाराष्ट्रसिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिलांचा व्हिडीओ घेणारा विकृत पोलिसांच्या ताब्यात

सिंहगड एक्स्प्रेसमध्ये महिलांचा व्हिडीओ घेणारा विकृत पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक व्यक्ती महिलांचे लपून फोटो आणि व्हिडीओ घेत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्या विकृत व्यक्तीला आज गुरूवारी एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसमध्ये गेल्या दोन दिवसांपासून एक व्यक्ती महिलांचे लपून फोटो आणि व्हिडीओ घेत असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. त्या विकृत व्यक्तीला आज गुरूवारी (ता. ०६ एप्रिल) एक्सप्रेसमधील प्रवाशांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद अश्रफ असे महिलांचे व्हिडीओ काढणाऱ्या विकृत नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या व्यक्तीला रंगेहाथ पकडताच प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिल्याचे सांगण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेस या ट्रेनमधून दररोज अनेक प्रवासी प्रवास करत असतात. गेल्या दोन दिवसांपासून या ट्रेनमध्ये एक लंपट व्यक्ती महिलांचे व्हिडीओ शूट करत होता. काल देखील हा प्रकार घडल्यानंतर तो काही प्रवाशांच्या लक्षात आला होता, मात्र त्यावेळी त्या व्यक्तीला पकडता आले नाही. पण आज काही प्रवाशांनी त्या विकृत व्यक्तीला महिलांचे लपून व्हिडीओ शूट करत असताना रंगेहात पकडले. त्यानंतर ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकाला पोहोचताच या विकृत व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तर सदर विकृत व्यक्तीची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

तर हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रवाशांनी या घटनेची माहिती टीसीला दिली. त्यानंतर टीसीने टीसीने कल्याण पोलिसांना फोन करून सदर घटनेची माहिती दिली. तोपर्यंत प्रवाशांनी त्याला पकडून ठेवले होते. कल्याण स्टेशन आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले. तसेच त्या विकृत मोहम्मद अश्रफ विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, हा प्रकार कर्जत येथे घडलेला असल्याने कल्याण लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा व आरोपी कर्दत लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या विकृताविरोधात कठोर कारावाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे दिवसा देखील महिला प्रवासी प्रवास करताना सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. याआधी मुंबई-पुणे सिंहगड एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून प्रवाशांमध्ये अनेकदा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. हे वाद हाणामारीपर्यंत देखील पोहोचले आहेत. पण अशा पद्धतीने महिलांचे व्हिडीओ काढल्याचा प्रकार घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अमेरिकेत हिंदूंच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ, एका अहवालातील निष्कर्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -