घरताज्या घडामोडी'अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ', मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याचा टीझर लॉन्च

‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ’, मुख्यमंत्री शिंदेंच्या दौऱ्याचा टीझर लॉन्च

Subscribe

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा पहिला टीझर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत्या 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याचा पहिला टीझर लॉन्च करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टिझरची टॅगलाइन अधिक लक्ष वेधून घेणार आहे. कारण या टीझरला ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ…’ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे. (cm eknath shinde ayodhya visit first teaser launch)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण शिंदे गटाला दिले. त्यानंतर पहिल्यांदाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि आमदार अयोध्येला जाणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर जारी करण्यात आला आहे. या टीझरमध्ये ‘अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ…’, असे सांगत या हिंदुत्व,भगवा अन् रामराज्याची झलक दाखवण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा टीझर वेगाने व्हायरल होत आहे. दरम्यान, या टीझरच्या टॅगलाइनमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य, महाराष्ट्र एक सुशासित राज्य असल्याचे दर्शवण्यात आले आहे. सामान्य जनता हा एक परिवार आहे, जनतेची सेवा, मानव सेवा सर्वोपरि आहे, असे या टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, अशी ग्वाही देत, रग रग में राम, कण कण में… अशा प्रकारे ओळी वापरून हिंदी भाषेतून हा टीझर बनवण्यात आला आहे. तर या टीझरच्या शेवटी अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.

दरम्यान, अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाणार असल्याची योजना शिंदे गटाने आखल्याचे समजते. एकनाथ शिंदे समर्थित शिवसेनेचे पक्षसंघटन आणि प्रतिमा दृढ करण्याची सुरुवात अयोध्या दौऱ्यापासून केली जाणार असल्याचेही बोलले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ‘रोशनी तुमची बहीण आहे, तिचा FIR नोंदवायला सांगा’, शिंदेंच्या ‘त्या’ पत्रावर आव्हाडांचा संताप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -