घरमहाराष्ट्रपद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला कर थकवल्याप्रकरणी जप्तीची नोटीस

पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला कर थकवल्याप्रकरणी जप्तीची नोटीस

Subscribe

२५ जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना केंद्राने मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला

ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेले ‘गुरुकुलम’ या संस्थेचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांच्या संस्थेला १ कोटी ८६ लाखांचा कर थकवल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नोटीस बजावली आहे. गिरीश प्रभुणे यांना केंद्र शासनाकडून नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे याची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली असून महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे.

दरम्यान, २५ जानेवारीला ज्येष्ठ समाजसेवक आणि पारधी समाजासाठी आयुष्य खर्ची घातलेल्या गिरीश प्रभुणे यांना केंद्राने मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. निस्वार्थ भावनेनं पारधी समाजासाठी उभ्या केलेल्या गुरुकुलम आणि परिसराचा १ कोटी ८६ लाखांचा कर थकल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेनं त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याच्या दुसर्याच दिवशी जप्तीची नोटीस बजावली आहे. या सर्वांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, ‘मला याबाबत कोणतीही माहिती नाही, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त रजेवर गेले असल्याने मी त्यांच्याकडून माहिती घेऊन कळवतो.’

- Advertisement -

गिरीश प्रभुणे यांच्याबद्दल…

गिरीश प्रभुणे यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. प्रभुणे गेल्या अनेक वर्षांपासून पारधी समाजाच्या हक्कासाठी आणि त्यांच्या उत्थानासाठी कार्य करत आहेत. पारधी समाजातील मुलांना शिक्षण मिळावं, त्यातही पारधी समाजातील मुलींना शिक्षण मिळावं, पारधी समाजाचं पुनर्वसन व्हावं यासाठी प्रभुणे कार्य करत आहेत. त्यासाठी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलम या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही संस्था कार्यरत आहे. पारधी समाजाच्या मुलांसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. या गुरुकुलमध्ये पारधी समाजातील २०० मुले आणि १५० मुली शिकत आहेत. प्रभुणे यांनी १९७० पासून पारधी समाजासाठी काम करण्यास सुरुवात केली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -