घरमहाराष्ट्रPM Modi: पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी उभारला जाणारा मंडप कोसळला; 4 कामगार जखमी

PM Modi: पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी उभारला जाणारा मंडप कोसळला; 4 कामगार जखमी

Subscribe

यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 25 फेब्रुवारीला महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांची यवतमाळ येथे भव्य सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यवतमाळ येथे भव्य मंडप उभारण्यात येत आहे. परंतु यादरम्यान एक अपघात झाला आहे. हा मंडप उभारला जात असतानाच अचानक कोसळला आणि त्यामध्ये चार कामगार जखमी झाले आहेत. सुदैवाने हे चारही कामगार बचावल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. (PM Narendra Modi Mandap to be erected for PM Modi s meeting collapses 4 workers injured)

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 28 फेब्रुवारीला यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी हे दोन लाखांहून अधित बचत गटांच्या महिलांना संबोधित करणात आहेत. या मेळाव्यासाठी भारी परिसरात सुमारे 45 एकर जागेत या मेळाव्याची तयारी केली जात असतानाच हा अपघात घडला आहे. सभेसाठी डोम उभारले जात असताना त्याचे तीन पिलर खाली कोसळले आणि तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुखापत झाली. त्यांना सध्या जवळच्या रुगणालयात दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

2014 पासून पंतप्रधान मोदी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा जिल्ह्यात येत आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचे दावेदार असताना नरेंद्र मोदी यांनी आर्णी तालुक्यातील दाभडी येथे शेतकऱ्यांसमवेत चाय पे चर्चा करून शेतमालास हमीभाव देण्याची ग्वाही दिली होती. त्यानंतर ते पंतप्रधानपदी विराजमानही झाले. मात्र, शेतकरी अद्यापही हमीभावासाठी आंदोलन करत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केळापूर येथे महिला मेळाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. त्यावेळीसुद्धा महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा त्यांनी केली होती. आता तिसऱ्यांदा ते लोकसभा निवडणुकीपूर्वीच महिला मेळाव्यासाठी यवतमाळला येत आहेत. या सभेत महिलांसाठी केंद्र व राज्य शासनाने राबवलेल्या विविध योजनांचा आढावा घेण्यासोबतच पंतप्रधान मोदी उपस्थित महिलांना भावनिक साद घालून लोकसभा निवडणुकीत रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे.

(हेही वाचा :Jarange on Fadnavis : “मला सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न”, मनोज जरांगेंचे फडणवीसांवर गंभीर आरोप)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -