घरमहाराष्ट्रपुणेAjit Pawar : "महायुतीचे सर्वाधिक खासदार निवडून आणा", अजित पवारांचे आवाहन

Ajit Pawar : “महायुतीचे सर्वाधिक खासदार निवडून आणा”, अजित पवारांचे आवाहन

Subscribe

यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळी जारी केले असून इंदापूर तालुका देखील दुष्काळी आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. आज अजित पवारांनी इंदापूरमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. यावेळी लोकसभेत महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून आणा आणि नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा खासदार बवू या, असे आवाहन इंदापूरकरांना केले आहे.

अजित पवार म्हणाले, “मी आज इंदापूरमध्ये आलो आहे. कारण मला घरातून प्रचाराला सुरुवात करून राज्यभर प्रचाराला बाहेर पडायचे आहे. लोकसभेत महायुतीचे जास्तीत जास्त खासदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. एनडीएमध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (आठवले) आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. यासाठी मोदींच्या विचाराचा एक एक खासदार निवडून आला पाहिजे.”

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation: आजच्या बैठकीत ठरणार मराठा आंदोलनाची दिशा- जरांगे पाटील

बारामती आणि इंदापूर माझे होमग्राऊंड

“माझी सुरुवाती आणि आताची कारकीर्द तुम्ही पाहिले तर साधारण: राज्याचा सर्वांगिण विकास व्हावा. सर्व जातीधर्माच्या लोकांनी गुण्यागोविंदाने रहावे, कोणत्याही जाती-धर्माने एकमेकांचा राग करू नये. छत्रपती शिवाजी महराजांनी सर्वांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्यांची स्थापना केली आहे. शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र केल्यामुळे हिंदवी स्वराज्य स्थापन झाला आहे. बारामती आणि इंदापूर पट्टा हे माझे होमग्राऊंड आहे. मला बारामतीकरांनी 1991 साली ऐवढी मते दिली की मीच आश्चर्यचकीत झालो होतो. त्यावेळी इंदापूर तालुक्यात माझे तसे काही काम नव्हते. गेली अनेक वर्ष तुम्ही मला या जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले आहे. सुरुवातीला इंदापूरचा वार्षिक 40 कोटी रुपयाचा होता. आता मी 40 कोटींचा वार्षिक आराखडा 1,250 कोटीपर्यंत नेहला आहे”, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Loksabha 2024: पाच राज्यांसाठी निवडणूक रणनीती; भाजप कार्यालयात दिवसभर बैठकांच्या फेऱ्या

शेतकऱ्याला पाणी मिळाले पाहिजे

दुष्काळाबाबत अजित पवार म्हणाले, “यंदा राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. राज्यातील 40 तालुक्यात दुष्काळी जारी केले आहेत. माझ्या माहितीप्रमाणे इंदापूर तालुका देखील दुष्काळी आहे. मी काल सात कालवे सल्लागार समित्या घेतल्या आहेत. माझी पण जात शेतकरी आहे आणि तुमची पण जात शेतकरी आहे. शेतकऱ्याला पाणी मिळाले पाहिजे. त्याचबरोबर शहरी भागावर देखील अन्याया होऊ नये. मी काल समित्यांच्या बैठका पार पडल्या आहेत”, अशी माहितीही अजित पवारांनी शेतकरी मेळाव्यात दिली आहे.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -