घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील आजच्या सभेत नरेंद्र मोदी कोणाला करणार 'लक्ष्य'

महाराष्ट्रातील आजच्या सभेत नरेंद्र मोदी कोणाला करणार ‘लक्ष्य’

Subscribe

मागील प्रचारसभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री शरद पवार यांच्यावर टिका केल्यानंतर आजच्या गोंदियाच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची अनेकांना उत्सुकता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सायंकाळी गोंदिया येथे सभा होता आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ मोदी यांची राज्यात होणारी ही दुसरी सभा असून आज ते कोणाला लक्ष्य करणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. आपल्या अधिकृत ट्वीटर हॅँडलवरून त्यांनी या सभेबदद्दलची माहिती मराठीमध्ये दिली आहे, ‘पुन्हा एकदा महाराष्ट्रात येतोय. गोंदिया येथे आपल्याशी संवाद साधेन’ असे त्यांनी त्यात म्हटलेय.

अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील सभेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेवरील चर्चेचा धुराळा अजूनही राज्यात खाली बसलेला नाही, तोवर आज पुन्हा एकदा ते काय बोलतील याची भाजपाच्या कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही उत्सुकता लागून आहे. आज केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये त्यांनी पुन्हा एकदा कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा समाचार घेतला आहे. ही गरीबहित विरोधी आघाडी असून येथील जनतेशी त्यांची नाळ कधी जुळलीच नसल्याचे त्यांनी त्यात म्हटलेय.

- Advertisement -

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणुकीतील भाजप-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आज (३ एप्रिल)सायंकाळी ५ वाजता बालाघाट रोड टी पार्इंट, बायपास मार्ग परिसरातील अटलधाम मैदानावर आयोजित करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -