घरदेश-विदेशयूएईने बनवले सर्वात महागडे परफ्यूम!

यूएईने बनवले सर्वात महागडे परफ्यूम!

Subscribe

युक्त अरब अमिरातमध्ये एक परफ्यूम बनवला गेला तो अगदीच खास आहे. यूएईच्या एका कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा परफ्यूम जगातील सर्वात महागडा परफ्यूम आहे.

परफ्यूम वापरणं ही चैन न राहता जीवनशैलीचा एक भाग बनत चालला आहे. रोज सकाळी ऑफिस कामानिमित्त बाहेर जाताना एखादे सौम्य परफ्यूम मारल्यानंतर दिवसभर फ्रेश वाटते. कोणालाही सुंगधाचे आकर्षण वाटणे सहाजिकच आहे. पुर्वीच्या काळात हे परफ्यूम, सुगंधी अत्तर फुलांपासून तयार केली जायची. मात्र आता अनेक विविध कंपन्या वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम, डियोडरेंट तयार करतात. मात्र संयुक्त अरब अमिरातमध्ये एक परफ्यूम बनवला गेला तो अगदीच खास आहे. यूएईच्या एका कंपनीने केलेल्या दाव्यानुसार हा परफ्यूम जगातील सर्वात महागडा परफ्यूम आहे.

‘शुमुख’ ची किंमत ९ कोटी 

हा परफ्यूम बनवण्यासाठी तब्बल तीन वर्षांचा काळ लागला. या तीन वर्षात त्याच्या तब्बल ४९४ वेळा चाचण्या घेण्यात आल्या. या परफ्यूमचे नाव आहे ‘शुमुख’असून अरबी भाषेत ‘शुमुख’चा अर्थ ‘सर्वात योग्य’ असा होतो. या तीन लिटर परफ्यूमची किंमत साधारण ९ कोटी रुपये इतकी आहे. नबील परफ्यूम ग्रृप ऑफ कंपनीच्या चेअरमन असणाऱ्या असगर अदम अली यांनी हा परफ्यूम बनवला आहे.

- Advertisement -

दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड

हे शुमुख परफ्यूम ठेवण्यासाठी इटालियन मुरानो क्रिस्टलची एक विशेष बाटली तयार करण्यात आली आहे. तिला सोन्यापासून बनवलेले गरूड, अरबी घोडे, गुलाब आणि पृथ्वीचा गोल यांच्या सहाय्याने सजवण्यात आले आहे. ३८.५५ कॅरेटचे ३५७१ हिरे, १८ कॅरेट सोन्याचे अडीच किलो मणी आणि ५.९ किलो शुद्ध चांदीचाही यामध्ये वापर करण्यात आला आहे.

- Advertisement -

या बाटलीनेच दोन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. गिनिज बुकनुसार पहिला सर्वात महागडा परफ्यूम ‘क्‍लाईव्ह ख्रिश्‍चियन नंबर १ इम्पिरियल मॅजेस्टी’हा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -