घरमहाराष्ट्रपुण्यात पुन्हा बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

पुण्यात पुन्हा बसला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

Subscribe

पिंपरीवरुन भोसरीला ही बस जात होती. दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर येताच या बसमधील इंजिनमधून धूर निघू लागला. त्यानंतर बसने पेट घेतला.

पुण्यामध्ये पुन्हा एकदा बसला आग लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर पीएमपीएमएल बसने अचानक पेट घेतला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही तसंच कोणीही जखमी झाले नाही. पिंपरीवरुन भोसरीला ही बस जात होती. दरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर येताच या बसमधील इंजिनमधून धूर निघू लागला. त्यानंतर बसने पेट घेतला. ही घटना पावणे चारच्या सुमारास घडली आहे. या बसमधून १५ प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले.

अशी घडली घटना 

पिंपरीवरुन भोसरीला जाणाऱ्या पीएमपीएमएल बसच्या इंजिनमधून धूर येत होता. यामुळे चालक दीपक भरणे यांनी बस रस्त्याच्याकडेला उभी करुन प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाशांना खाली उतरवले. यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेमध्ये कोणीही जखमी झाले नाही. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशनम दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. या आगीमध्ये बस जळून खाक झाली आहे. या घटनेमुळे वारंवार बस पेटण्याच्या प्रकारामुळे पीएमपीएमएल बसच्या देखभाल, दुरुस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- Advertisement -

आग लागण्याची तिसरी घटना 

गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीएमएल बसला आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. १५ सप्टेंबरला रात्री उशिरा कोथरूड बस डेपोमध्ये उभ्या असलेल्या बसला अचानक आग लागली होती. आगीत निम्मी बस जळून खाक झाली होती. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचे तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. कोथरूड डेपोजवळ उभी केलेली पीएमपीएमएल बस पेटण्याची ही दुसरी घटना होती. भारत बंदच्या दिवशी कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटेच्या सुमारास पेटली होती. पीएमपीएमएलच्या बसेस जागेअभावी रात्री रस्त्यावर उभ्या केल्या जातात. त्यानंतर आता आज बसला आग लागल्याची तिसरी घटना घडली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -