घरमहाराष्ट्रबीड हत्याप्रकरणातील एक आरोपी अटकेत

बीड हत्याप्रकरणातील एक आरोपी अटकेत

Subscribe

बीड येथे बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून एका तरुणाने मेहुण्याची हत्या केली होती. ही हत्या त्याने मित्रांच्या सहाय्याने केली होती. याप्रकरणी पोलिस शोध घेत असून त्यातील एका आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बीडमध्ये भर दिवसा एका तरुणाची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. आपल्या बहिणीने प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या भावाने मित्रांच्या मेहुण्याची हत्या केली. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सुमीत वाघमारे असे आहे. सुमीतची हत्या करणाऱ्या तरुणाचे नाव बालाजी लांडगे असे आहे. हत्या केल्यापासून बालाजी आणि त्याचे जोडीदार फरार आहेत. पोलीस या गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. कृष्णा क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगेला सहकार्य केल्याच्या आरोपाप्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे.

हेही वाचा – ऑनर किलिंगची घटना गंभीर; कुठे आहेत जिल्ह्याच्या गृहमंत्री? – धनंजय मुंडे

- Advertisement -

नेमकं काय आहे प्रकरण?

बीड येथे राहणाऱ्या सुमित वाघमारेचं दोन महिन्यापूर्वी भाग्यश्री या वर्गमैत्रिणीसोबत प्रेम विवाह झाला होता. सुमित वाघमारे आणि भाग्यश्री हे वर्गमित्र होते. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी लग्न देखील केले. मात्र त्यांच्या लग्नाला भाग्यश्रीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र घरच्यांचा विरोध झुगारुन भाग्यश्रीने सुमितसोबत लग्न केलं. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. बहिणीने प्रेमविवाह केला याचा भाग्यश्रीच्या घरातल्यांना राग होता. आपल्या बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन सुमितला मारुन टाकण्याचा भाग्यश्रीच्या भावाचा कट होता. बुधवारी सायंकाळी भाग्यश्रीच्या भावाने त्याच्या साथिदारांसह सुमितवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुमित रस्त्यावर कोसळला. भाग्यश्रींने रस्त्यावरील नागरिकांची मदत मागितली. भाग्यश्रीच्या हाकेला नागरिक धावून आले आणि त्यांनी सुमितला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान सुमितचा मृत्यू झाला आहे. सुमितवर हल्ला करणारे तिन्ही आरोपी फरार होते. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. बाकिच्या दोघांचाही पोलीस शोध घेत आहेत.


हेही वाचा – बीडमध्येही ‘सैराट’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -