घरमहाराष्ट्रबीडमध्येही 'सैराट'

बीडमध्येही ‘सैराट’

Subscribe

बीडमध्ये भर रस्त्यात बहिणीच्या नवऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत सुमित वाघमारे या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

हैदराबादमध्ये आंतरजातीय विवाहातून आणखी एका जोडप्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. बीडमध्ये प्रेमविवाह केल्याने मेव्हूण्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याने मेव्हूण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीड येथे घडली आहे. भर रस्त्यात बहिणीच्या नवऱ्याची धारदार शस्त्राने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सुमीत वाघमारे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

नेमके काय घडले?

बीड येथे राहणाऱ्या सुमित वाघमारेचं दोन महिन्यापूर्वी भाग्यश्री या वर्गमैत्रिणीसोबत प्रेम विवाह झाला होता. सुमित वाघमारे आणि भाग्यश्री हे वर्गमित्र होते. त्यांची एकमेकांशी चांगली मैत्री होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोन महिन्यांपूर्वी या दोघांनी लग्न देखील केले. मात्र त्यांच्या लग्नाला भाग्यश्रीच्या घरच्यांचा विरोध होता. मात्र घरच्यांचा विरोध झुगारुन भाग्यश्रीने सुमितसोबत लग्न केलं. परंतु हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

- Advertisement -

मेव्हूण्याने घेतला बळी

बहिणीने प्रेमविवाह केला याचा भाग्यश्रीच्या घरातल्यांना राग होता. आपल्या बहिणीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरुन सुमितला मारुन टाकण्याचा भाग्यश्रीच्या भावाचा कट होता. बुधवारी सायंकाळी भाग्यश्रीच्या भावाने त्याच्या साथिदारांसह सुमितवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात सुमित रस्त्यावर कोसळला. भाग्यश्रींने रस्त्यावरील नागरिकांची मदत मागितली. भाग्यश्रीच्या हाकेला नागरिक धावून आले आणि त्यांनी सुमितला उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचारा दरम्यान सुमितचा मृत्यू झाला आहे. सुमितवर हल्ला करणारे तिन्ही आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु आहे.

कठोर शिक्षा व्हावी

सुमितच्या हत्ये प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी सुमितच्या घरच्यांनी केली आहे. आरोपी फरार असले तरी त्यांना लवकरात लवकर शोधून त्या आरोपींवा कठोर शिक्षा करण्यात यावी.

- Advertisement -

वाचा – हैदराबादमध्येही ‘सैराट’!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -