घरमनोरंजनIndion Idol 10 : विजेत्यावर महागड्या गिफ्ट्सची बरसात

Indion Idol 10 : विजेत्यावर महागड्या गिफ्ट्सची बरसात

Subscribe

सलमन अलीने स्वत: विजेत्या ट्रॉफीसोबतचा एक फोटो सोशल मीडिवर शेअर केला असून, देशभरातील लोकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे.

सोनी वाहिनीवरील ‘इंडियन आयडॉल’ या फेमस शोचं १०वं पर्व काल संपन्न झालं. गायक सलमान अली इंडियन आयडॉलच्या १० व्या पर्वाचा विजेता ठरला. ‘Indian Idol 10’च्या संपूर्ण पर्वात अलीने त्याच्या आवाजाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. आपल्या जादूई आवाजाने त्याने परीक्षकांचं आणि संपूर्ण देशातील प्रेक्षकांचं मन जिंकलं. काल रविवारी सीझनच्या विजेत्याचं अर्थात सलमानचं नाव जाहीर झालं आणि त्याच्या कुटुंबियांच्या आनंदाला उधाण आलं. इंडियन आयडॉल १० ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सलमानचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. सलमानने अंतिम फेरीत  नितीन कुमार, अंकुश भारद्वाज, नीलांजना रे आणि विभोर पाराशर या चौघांना मात देत ट्रॉफी आपल्या नावावर केली. या सोहळ्याला चारचांद लावले ते ‘झिरो’ चित्रपटाच्या टीमने. झिरोचे प्रमुख कलाकार शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कॅटरिना कैफ हे तिघे इंडियन आयडॉलच्या ग्रॅण्ड फिनालेला हजर होते. ‘झिरो’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या या तिघांनी स्पर्धेतील सगळ्या गायकांसोबत आणि परीक्षकांसोबत चांगलीच धमाल केली.

सलमन अलीने स्वत: विजेत्या ट्रॉफीसोबतचा एक फोटो सोशल मीडिवर शेअर केला असून, देशभरातील लोकांकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. देशभरात सलमानच्या आवाजाचे सर्व वयोगटातील लाखो चाहते आहेत.

- Advertisement -

महागड्या गिफ्ट्सची बरसात…

कुठलाही बीग बजेट रिअॅलिटी शो म्हटलं की, शोच्या भव्य-दिव्यतेची जेवढी चर्चा असते तेवढीच चर्चा असते शो जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळणाऱ्या महागड्या गिफ्ट्सची. अशाप्रकारच्या शोमध्ये जिंकणाऱ्या विजेत्यावर किंवा विजेतीवर गाडी, घर, कुटुंबासह फॉरेनची ट्रीप आणि लाखो-करोडो रुपयांचा धनादेश आदी गिफ्ट्सची अक्षरश: बरसात केली जाते. इंडियन आयडॉल १० चा विजेत ठरलेला सलमानही याला अपवाद नाही. आता सलमानला शोकडून नेमकी कोणकोणती गिफ्ट्स मिळाली हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहा आणि सोबतच जाणून घ्या, सलमान अलीच्या भूतकाळाविषयी आणि त्याच्या कुटुंबाविषयी…

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -